ना Apple, ना Xiaomi, OnePlus, वर्षभरात या मोबाईलची सर्वाधिक विक्री

जगातील बर्‍याच स्मार्टफोन कंपन्या अँड्रॉयडचा वापर करतात. तर Apple ची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम आहे. (most popular android smartphone in world)

ना Apple, ना Xiaomi, OnePlus, वर्षभरात या मोबाईलची सर्वाधिक विक्री
Samsung Galaxy A32
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 7:11 PM

मुंबई : जगातील बर्‍याच स्मार्टफोन कंपन्या अँड्रॉयडचा वापर करतात. तर Apple ची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम आहे. परंतु शाओमी, वनप्लस, ओप्पो, सॅमसंग आणि व्हिवो यांसारखे जगभरातील अनेक मोठे ब्रँड्स त्यांच्या फोनमध्ये अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टिम वापरतात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे की 2020 मधील सर्वाधिक लोकप्रिय 100 स्मार्टफोनच्या यादीत कोणत्या कंपनीचा किंवा कोणत्या स्मार्टफोनचा पहिला क्रमांक असेल? Omdia च्या म्हणण्यानुसार, सॅमसंग गॅलेक्सी ए 51 (Samsung Galaxy A51) हा वर्ष 2020 मधील सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन आहे. (This is the world most popular android smartphone in the world)

Omdia च्या अहवालानुसार, सॅमसंगने 2020 मध्ये गॅलेक्सीच्या 23.2 मिलियन्स (2.32 कोटी) युनिट्सची विक्री केली आहे. तर आयओएसमध्ये (iOS) आयफोन 11 ही सिरीज 2020 मध्ये सर्वाधिक खरेदी केली गेली आहे. पहिल्या 10 स्मार्टफोनच्या यादीत 5 अँड्रॉयड फोन आणि 5 आयफोन आहेत. 5 अंड्रॉयड स्मार्टफोनपैकी 4 स्मार्टफोन सॅमसंग आणि 1 फोन शाओमीचा आहे. दरम्यान, Apple ने आयफोन 11 च्या 64.8 मिलियन युनिट्स शिप केले आहेत. दरम्यान या अहवालात म्हटले आहे की, आयफोनने बेस्ट सेलिंग स्मार्टफोन कंपनी होण्याचा बहुमान दुसऱ्यांदा मिळवला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए 51 मध्ये काय आहे खास?

सॅमसंग गॅलेक्सी ए 51 (Samsung Galaxy A51) या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड 10 वर आधारित One UI 2.0 प्रोसेसर आहे. यात 6.5 इंचाचा फुल एचडी (1080×2400 पिक्सल) सुपर अमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 8 जीबी पर्यंत रॅम दिला आहे. या फोनच्या मागे क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर 48 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. सोबत 12 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सचा मायक्रो कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरही देण्यात आला आहे. सेल्फीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए 51 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A51 या फोनची किंमत 20,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये तुम्हाला ऑक्टा कोर एग्जिनॉस 9611 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच पॉवरसाठी यामध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला डुअल सिम सपोर्ट मिळेल, जो डेडिकेटेड मायक्रो एसडी कार्ड स्लॉटसह येतो. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत या फोनमध्ये यूएसबी टाइप सी, 3.5mm जॅक, ब्लूटूथ v5.0, 802.11 a/b/g/n/c वायफाय देण्यात आला आहे.

इतर बातम्या

Moto E7 Power Review : मोटोरोलाचा नवा बजेट फोन भारतात लाँच, जाणून घ्या स्मार्टफोनबाबत सर्व माहिती

OPPO F19 Pro, F19 Pro+5G स्मार्टफोन्सचे फीचर्स लीक, जानून घ्या काय असेल खास

पोको फोनच्या नावाने लॉन्च होणार रेडमी के 40 ; स्मार्टफोनमध्ये मिळणार 5 जी सपोर्ट

अवघ्या 10 दिवसात 2.5 लाख स्मार्टफोन्सची विक्री, POCO च्या ‘या’ फोनचा भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ

(This is the world most popular android smartphone in the world)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.