अवघ्या 10 दिवसात 2.5 लाख स्मार्टफोन्सची विक्री, POCO च्या ‘या’ फोनचा भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ

POCO India कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला भारतात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. POCO M3 असं या फोनचं नाव आहे.

अवघ्या 10 दिवसात 2.5 लाख स्मार्टफोन्सची विक्री, POCO च्या 'या' फोनचा भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ
Poco-m3
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 10:06 AM

मुंबई : POCO India कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला भारतात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचं नाव POCO M3 असं असून हा स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. विक्रीसाठी उपलब्ध होताच काही वेळातच हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. त्यानंतर हा फोन आज पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. (2.5 lakh units of POCO M3 sold in just 10 days in India)

हा स्मार्टफोन 2 फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात आला होता. 9 फेब्रुवारीला या फोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर काही वेळात या फोनच्या सर्व युनिट्सची विक्री झाल्यामुळे हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. त्यानंतर 16 फेब्रुवारीला याचा सेल आयोजित करण्यात आला होता. तेव्हादेखील याचे अनेक वेरिएंट्स आऊट ऑफ स्टॉक झाले होते. 23 फेब्रुवारीलादेखील या स्मार्टफोनचा सेल आयोजित करुण्यात आला होता. त्यावेळीदेखील या फोनच्या हजारो युनिट्सची विक्री झाली आहे.

दरम्यान, हा फोन लाँच केल्यानंतर सुरुवातीच्या अवघ्या 10 दिवसात POCO M3 या स्मार्टफोनने मोठा माईलस्टोन गाठला आहे. लाँचिंगनंतर 10 दिवसात या फोनच्या 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व फोन एकट्या फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे विकले गेले आहेत. दरम्यान, कंपनीने असा दावा केला आहे की, आतापर्यंत 30 लाखांहून अधिक भारतीय ग्राहकांनी पोको च्या या स्मार्टफोनमध्ये इंटरेस्ट व्यक्त केला आहे.

किफायतशीर किंमत

कंपनीने POCO M3 स्मार्टफोनचे दोन वेरिएंट्स सादर केले आहेत. ज्यामध्ये 6GB RAM आणि 64GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये इतकी आहे, तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662G प्रोसेसरवर चालतो.

जबरदस्त फीचर्स

Poco M3 या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले वॉटरड्रॉप स्टाईल नॉचसह सादर करण्यात आला आहे. पोको एम 3 स्मार्टफोन गुगलच्या अँड्रॉयड 11 ऑपरेटिंग सिस्टिम बेस्ड एमआययूआय वर आधारित आहे. फोनमध्ये 6000 MAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पोको एम 3 स्मार्टफोन OnePlus 8T Cyberpunk 2077 स्पेशल एडिशन प्रमाणे डिझाइन करण्यात आलेला आहे. फोन ड्युअल टोन फिनिश आणि पोको ब्रँडिंग कॅमेर्‍यासह सादर करण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Poco M3 या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा (रियर कॅमेरा) देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेंसर सपोर्ट आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सला कॅमेरा देण्यात आला आहे.

फ्लिपकार्टवर उपलब्ध

POCO M3 एक्सक्लूसिव्हली ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन कूल ब्लू, पॉवर ब्लॅक आणि येल्लो या कलर ऑप्शन्ससह लाँच केला आहे. या फोनचा टीझर पाहिल्यानंतर युजर्समध्ये या स्मार्टफोनबाबत खूप क्रेझ निर्माण झाली होती. कंपनीने POCO M3 हा स्मार्टफोन इंडोनेशियात आधीच लाँच केला होता. तेव्हापासून या फोनबाबत भारतीय युजर्समध्ये मोठी उत्सुकता होती. त्यामुळे हा फोन भारतीय युजर्सच्या पसंतीस उतरेल आणि याची मोठ्या प्रमाणात विक्री होईल, असे अंदाज वर्तवण्यात येत होते. अपेक्षेप्रमाणे या फोनने भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे.

हेही वाचा

40% डिस्काऊंटसह Samsung, Oneplus, Xiaomi, Apple चे स्मार्टफोन्स खरेदी करा

ट्रिपल कॅमेरासह Redmi 9 Power चं 6GB रॅम वेरिएंट भारतात लाँच, किंमत…

64MP Quad Camera, 7000mAh बॅटरी, इन्स्टंट डिस्काऊंटसह Samsung Galaxy F62 चा पहिला सेल

(2.5 lakh units of POCO M3 sold in just 10 days in India)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.