40% डिस्काऊंटसह Samsung, Oneplus, Xiaomi, Apple चे स्मार्टफोन्स खरेदी करा

तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण अमेझॉनने जबरदस्त ऑफर सादर केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:22 AM, 23 Feb 2021
1/6
अमेझॉन इंडिया आणि महिंद्रा इलेक्ट्रिकमध्ये करार
भविष्यात भारतात डिजिटल कर्मचार्‍यांना मागणी
2/6
या ऑफरमध्ये नवीनच लाँच केलेले स्मार्टफोन्स Samsung M02, Samsung M02s, Redmi 9 Power आणि Mi 10i देखील तुम्ही खरेदी करु शकता. तुम्ही जर कोटक बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याद्वारे ईएमआय ट्रान्झॅक्शन (व्यवहार) करुन तुम्ही 1,250 रुपयांपर्यंत 10% त्वरित सूट (इन्स्टंट डिस्काऊंट) मिळवू शकता.
3/6
अमेझॉन प्राईम मेंबर्स एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड्द्वारे अॅडवांटेज नो कॉस्ट ईएमआयचा लाभ घेऊ शकतात. हे स्मार्टफोन खरेदी करताना कंपनीकडून कमीत कमी ईएमआयची सुविधा देण्यात आली आहे. सर्वात कमी 1,333 रुपये प्रति महिना ईएमआयची सुविधा दिली गेली आहे. ग्राहक टॉप ब्रँड्सवर 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयसह (No-Cost EMI) 2000 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ शकतात.
4/6
Fab Phones Fest मध्ये नवीनच लाँच करण्यात आलेल्या Redmi 9 Power आणि Mi 10i हे दोन फोन एक्स्ट्रा बँक ऑफर्ससह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पॉवरहाउस नोट 9 सिरीज (Powerhouse Note 9 series) 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. Redmi Note 9 Pro हा स्मार्टफोन 11,999 रुपये इतक्या कमी किंमतीत खरेदी करता येईल. तसेच Xiaomi चे स्मार्टफोन्स तुम्ही 12 महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट EMI ऑफरसह खरेदी करु शकता.
5/6
सॅमसंग एम सिरीज (Samsung Galaxy M-series) स्मार्टफोनवर एक्स्ट्रा अमेझॉन कूपन ऑफरसह 30% पर्यंतची सूट दिली जात आहे. भारतातला पहिला 7000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन Samsung Galaxy M51 तुम्ही 7,250 रुपयापर्यंतच्या एक्स्ट्रा कूपन ऑफरसह खरेदी करु शकता. तर Samsung M31s स्मार्टफोन तुम्ही 4,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काऊंटसह खरेदी करु शकता.
6/6
तुम्ही जर आयफोनवेडे असाल तर स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. तुम्ही बँक ऑफरसह आयफोन 12 मिनी खरेदी करू शकता. ऑफरमध्ये हा फोन तुम्ही 58,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सोबतच ओप्पो आणि व्हिव्हो स्मार्टफोनवरही तुम्हाला उत्तम ऑफर मिळू शकतात.