OPPO F19 Pro, F19 Pro+5G स्मार्टफोन्सचे फीचर्स लीक, जानून घ्या काय असेल खास

OPPO F19 Pro, F19 Pro+5G स्मार्टफोन्सचे फीचर्स लीक, जानून घ्या काय असेल खास

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी OPPO लवकरच F19 सिरीजमधील स्मार्टफोन भारतात लाँच करू शकते. (Oppo F19 Pro and Oppo F19 Pro+ 5G to launch)

अक्षय चोरगे

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 01, 2021 | 9:06 AM

मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी OPPO लवकरच F19 सिरीजमधील स्मार्टफोन भारतात लाँच करू शकते. याबत मिळालेल्या माहितीनुसार या सिरीजमध्ये Oppo F19 Pro आणि Oppo F19 Pro+ 5G यासह दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले जातील. अद्याप या फोनची लॉन्चिंग डेट जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु या स्मार्टफोनची काही वैशिष्ट्ये (फीचर्स) लीक झाली आहेत. (Oppo F19 Pro and Oppo F19 Pro+ 5G features leaked phone will come with price of Rs 20000 and 25000 respectively)

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काही रिपोर्ट्समधून अशी माहिती मिळाली आहे की, ओप्पोच्या नव्या सिरीजमधील (F19 ) स्मार्टफोन्स मार्चमध्ये भारतीय मार्केटमध्ये डेब्यू करतील. अद्याप या स्मार्टफोनच्या किंमतींबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, या सिरीजअंतर्गत तीन किंवा चार नवे स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात. त्यात OPPO F19, OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro + 5G या स्मार्टफोन्सचा समावेश असेल.

तिन्ही स्मार्टफोन्सच्या नावावरुन कळतंय की, केवळ OPPO F19 सिरीजमधील OPPO F19 Pro + 5G या स्मार्टफोनमध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी मिळेल. या फोनचा यापूर्वीच Google ARCore डिव्हाईसेसच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

OPPO F19 Pro चे फीचर्स

OPPO F19 Pro च्या स्पेसिफिकेशनबाबत बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचांचा पंच-होल AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. सोबतच फोनमध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा + 8MP (अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स) + 2MP (मोनोक्रोम) + 2MP (मॅक्रो) सेंसरचा समावेश असेल. सोबतच सेल्फीसाठी या फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाईल. OPPO F19 Pro स्मार्टफोन ColorOS 1 अँड्रॉयड 11 वर आधारित असेल. यामध्ये 4,310mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते, जो 30W VOOC फ्लॅश चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करेल.

OPPO F19 Pro+ 5G चे फीचर्स

OPPO F19 Pro+ 5G च्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये 6.4 इंचांचा पंच होल AMOLED डिस्प्ले मिळेल. सोबतच हा फोन MediaTek Dimensity 800U प्रोसेसरने सुसज्ज असा असेल. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज स्पेस मिळेल. तसेच या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला जाईल. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 30W च्या फास्ट चार्जिंगसह 4500mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल.

हेही वाचा

ट्रिपल कॅमेरासह Redmi 9 Power चं 6GB रॅम वेरिएंट भारतात लाँच, किंमत…

64MP Quad Camera, 7000mAh बॅटरी, इन्स्टंट डिस्काऊंटसह Samsung Galaxy F62 चा पहिला सेल

अवघ्या 10 दिवसात 2.5 लाख स्मार्टफोन्सची विक्री, POCO च्या ‘या’ फोनचा भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ

(Oppo F19 Pro and Oppo F19 Pro+ 5G features leaked phone will come with price of Rs 20000 and 25000 respectively)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें