राज ठाकरे रेल्वेने नागपुरात दाखल, आजपासून पुढचे 5 दिवस मिशन विदर्भ!

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून यांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबई ते नागपूर असा रेल्वेने प्रवास केला.

राज ठाकरे रेल्वेने नागपुरात दाखल, आजपासून पुढचे 5 दिवस मिशन विदर्भ!
| Edited By: | Updated on: Sep 18, 2022 | 9:00 AM

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Vidarbh Daura) आजपासून यांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबई ते नागपूर असा रेल्वेने प्रवास केला. रेल्वेने प्रवास करत ते नागपुरात दाखल झालेत. आज ते नागपुरात मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहे. आगामी निवडणुकांच्या (Nagpur Municipality Elections) दृष्टीने मनसेची ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरेंचा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जातोय. या दौऱ्यादरम्यान, नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. फक्त नागपुरातच नव्हे, तर विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना राज ठाकरे भेटी देणार आहे. येत्या 22 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच 5 दिवस राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असणार आहे.