AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS Sandip Deshpande : संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल, पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न नडला

दिवसेंदिवस मनसे नेत्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. कारण आता मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न नडला आहे.

MNS Sandip Deshpande : संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल, पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न नडला
संदीप देशापांडेंची कोठडी मागणाऱ्या पोलिसांनाच कोर्टानं झापलं, हा सर्व प्रकार काल्पनिक असल्याची टिप्पणीImage Credit source: tv9
| Updated on: May 04, 2022 | 6:05 PM
Share

मुंबई : दिवसेंदिवस मनसे (MNS) नेत्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. कारण आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) आणि संतोष धुरी यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना पोलिसांना (Mumbai Police) चकमा देण्याचा प्रयत्न नडला आहे. या प्रकरणी पोलीस आता एक्शन मोडमध्ये आले आहे. त्यामुळे संदीप देशपांडेंचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. राज्यात सध्या यावरून जोरदार घमासान सुरू आहे. राज ठाकरे हे मशीदीवरील भोंगे उतरवण्यावर ठाम राहिल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राज्यभर हनुमान चालीसा लावत रान पेटवलं आहे. पोलिसांनी इशारा दिल्यानंतरही गनिमी काव्याने हनुमान चालीसा लावण्याचे प्रयत्न मनसे कार्यकर्ते करत आहे. त्यामुळे पोलिसांकडून मनसे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. अनेकजण पोलिसांच्या ताब्यातही आहे. सकाळी पोलीस हे मनसे नेत्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला आहे.

नेमका प्रकार काय घडला

मुंबई पोलीस हे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांना चकवा देत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या गाडीत बसत पळ काढला. यावेळी पोलीस त्यांना थांबवण्याचा आणि पडण्याचा प्रयत्न करत होते. देशपांडे यांच्या काडीचा दरवाजाही उघडा होता. मात्र देशपांडे यांनी गाडी तशीच पुढे नेल्याने त्यांना पडण्याचा प्रयत्न करणारी महिला पोलीस कर्मचारी खाली कोसळली. संदीप देशपांडे हे निघून गेले. त्यानंतर याच प्रकरणात आता पोलिसांनी त्यांच्यावर आणि धुरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या दोघांचा शोधही सध्या पोलीस घेत आहे. यात पोलीस आता कठोर पाऊलं उचलण्याची शक्यता आहे.

अनेक मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यभर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहे. तर काहींना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तर काही नुकसान केल्यास त्याची वसुलीही मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केली जाईल असा इशाराही सरकारने दिला आहे. मात्र तरीही काही ठिकाणी हनुमान चालीसा लावण्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिही पोलिसांसाठीही कसोटीची राहणार आहे. तसेच सरकारही याबाबत लवकरच काही निर्णय घेण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्या मशीदीवरील भोंग्याचा वाद पेटला आहे. आता तर राज ठाकरेंनी याविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.