MNS Sandip Deshpande : संदीप देशापांडेंची कोठडी मागणाऱ्या पोलिसांनाच कोर्टानं झापलं, हा सर्व प्रकार काल्पनिक असल्याची टिप्पणी

संदीप देशपांडे आज्ञातवासात गेले. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली. त्यांना कोर्टात अटकपूर्व जामीनही मिळाला. मात्र त्यांची पोलीस कोठडी मागणाऱ्या पोलिसांना आज कोर्टाने झापलं आहे. हा सर्व प्रकार काल्पनिक असल्याचे मत कोर्टाने नोंदवले आहे.

MNS Sandip Deshpande : संदीप देशापांडेंची कोठडी मागणाऱ्या पोलिसांनाच कोर्टानं झापलं, हा सर्व प्रकार काल्पनिक असल्याची टिप्पणी
संदीप देशापांडेंची कोठडी मागणाऱ्या पोलिसांनाच कोर्टानं झापलं, हा सर्व प्रकार काल्पनिक असल्याची टिप्पणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 5:25 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मनसे नेते संदीप देशापांडे (Sandip Deshpande) यांचं नाव चर्चेत आहे. कारण पोलिसांनी मनसे (MNS) कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन जाणाऱ्या संदीप देशापांडे यांच्यावर अनेक आरोप झाले. संदीप देशपांडे गाडीतून निघताना एक महिला पोलीस कर्मचारी (Mumbai Police) धक्का लागून कोसळल्याचा प्रकार घडला होता. मात्र माझ्यामुळे या महिला कर्मचारी कोसळल्या नाहीत, असे संदीप देशपांडे वारंवार सांगत होते. तर शिवसेनेकडून यावरून टीका होत होती. त्यानंतर पोलिसांनी याच प्रकरणात संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्यांचा शोधही सुरू केला. मात्र संदीप देशपांडे आज्ञातवासात गेले. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली. त्यांना कोर्टात अटकपूर्व जामीनही मिळाला. मात्र त्यांची पोलीस कोठडी मागणाऱ्या पोलिसांना आज कोर्टाने झापलं आहे. हा सर्व प्रकार काल्पनिक असल्याचे मत कोर्टाने नोंदवले आहे.

कोर्टानं पोलिसांनाच सुनावलं

या प्रकरणात पोलिसांनी कोठडी मागितला असता हा सर्व प्रकार काल्पनिक आहे. हे प्रकरण कोणत्याही तथ्यावर अधारित नाही. आरोपींच्या कोठडीसाठी कोणतेही ठोस कारण नाही. खास अधिकारांच्या आणि कल्पनाशक्तिच्या आधारे केस बनू शकत नाही. देशपांडे आणि धुरी यांचा जाणीवपूर्वक इजा पोहचवण्याचा हेतू नव्हता, असेही कोर्टाने खडसावलं आहे.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले, ही पोलिसांना नसून सरकारला चपराक आहे. राज्य सरकारच्या दबावाखाली पोलीस काम करत होते. चुकीची कलमं लावण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला. आम्ही सरकारविरोधात बोलतो, आवाज उठवतो, म्हणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न होती. मात्र आमचा न्यायालयावर विश्वास आहे. यामध्ये आमचा कुणालाही धक्का लागला नव्हाता. तेच मत कोर्टाने नोंदवलं आहे. आणि त्याआधारेच हा निर्णय दिला आहे. कुठलाही कटकारस्थान करण्याचा हेतू आरोपींचा नव्हता असे कोर्टाने म्हटलं आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

कधी घडलं होतं हे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची औरंगाबादेतली सभा पार पडली. त्यानंतर राज ठाकरेंनी भोंग्याविरोधातील आंदोलन आणखी तीव्र केले. तर दुसरीकडे पोलिसांनी मनसे नेत्यांची धरपकड सुरू केली. यावेळी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनाही ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले असता हा प्रकार घडला होता. त्यातच आता संदीप देशपांडे यांना मोठा दिलासा आणि पोलीस आणि सरकारला मोठी चपराक कोर्टाने दिली आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.