राज ठाकरे नव्या जोमाने कामाला, नवीन वर्षात मनसेचं महाअधिवेशन

| Updated on: Dec 20, 2019 | 4:17 PM

जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात मुंबईमध्ये मनसेचं महाअधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे.

राज ठाकरे नव्या जोमाने कामाला, नवीन वर्षात मनसेचं महाअधिवेशन
Follow us on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पराभवाची धूळ झटकून नव्या जोमाने कामाला लागणार आहेत. नवीन वर्षात मनसेचं महाअधिवेशन आयोजित केलं जाणार आहे. मनसेच्या महाअधिवेशनाला (MNS Special Session in Mumbai) राज्यभरातून एक लाख कार्यकर्ते येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात मुंबईमध्ये मनसेचं महाअधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकत्व कायद्यावरुन राज्यात जे आंदोलन सुरु आहे, नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार आहेत.

ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त जवळपास निश्चित

गेल्या दीड महिन्यात राजकीय सत्तास्थापनेचा गोंधळ सुरु होता, याबाबाबत लोकांच्या मनात नेमकं काय आहे, विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांकडून लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. यानंतर पुढची भूमिका पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे ठरवतील, असंही नांदगावकरांनी सांगितलं.

गेल्या दीड महिन्यापासून जो बिन पैशांचा तमाशा सुरु होता, त्यावर चर्चा करण्यासाठी आज संवाद शिबीर आयोजित केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सविस्तर माहिती घेऊन त्यावर चर्चा करण्यासाठी आणि इतरही विषयांबाबत चर्चा करण्यासाठी संवाद शिबीर आयोजित केलं होतं. बाकी उद्या सविस्तरपणे बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. राज ठाकरे उद्या पुण्यात पत्रकार परिषद (MNS Special Session in Mumbai) घेणार आहेत.