ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त जवळपास निश्चित

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली.

नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त (Maharashtra cabinet Expansion) ठरला आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra cabinet Expansion) होईल, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. सध्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 7 मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2 अशा 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. 28 नोव्हेंबरला शपथविधी झाल्यानंतर, 12 डिसेंबरला खातेवाटप झालं होतं.

सध्या 6 मंत्र्यांवरच सर्व खात्याचा भार आहे. एका-एका मंत्र्यांकडे सात-आठ खाती आहेत. त्यामुळे आता तीनही पक्षाच्या अन्य नेत्यांना मंत्रिपदं देऊन, ठाकरे सरकार पहिला विस्तार करणार आहे.  या विस्तारात काही खात्यांची आदलाबदल होऊ शकते, असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने ‘पीटीआय’ला सांगितलं.

शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नेमकी किती मंत्रिपदं, याचा फॉर्म्युला अधिकृतरित्या कोणत्याही पक्षाने सांगितलेला नाही. मात्र खातेवाटपामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला 13 आणि काँग्रेसकडे 12 खाती आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना 10, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीचे 11 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ही नावं रविवारी निश्चित होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेकडील महत्त्वाची खाती – मुख्यमंत्री, गृह, नगरविकास, उद्योग, कृषी, क्रीडा आणि परिवहन, सार्वजनिक बांधकाम

राष्ट्रवादीकडील महत्त्वाची खाती –  अर्थ, गृहनिर्माण,राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा

काँग्रेसकडील महत्त्वाची खाती – महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण

संबंधित बातम्या  

ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर, शिवसेनेकडे तगडी खाती, एकट्या एकनाथ शिंदेंकडे 10 मंत्रालये 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *