राज्यात नवं समीकरण, भाजप-मनसे एकत्र, मनसेचा व्हिप ‘टीव्ही 9’च्या हाती

नाशिक महापौर निवडणुकीत मनसेने भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश नगरसेवकांना दिले होते. मनसेने आपल्या 5 नगरसेवकांना बजावलेल्या व्हीपची एक्स्कलुझिव्ह कॉपी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.

राज्यात नवं समीकरण, भाजप-मनसे एकत्र, मनसेचा व्हिप 'टीव्ही 9'च्या हाती

नाशिक : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महासेनाआघाडी होत असताना, तिकडे नाशिकमध्ये नवी समीकरणं जुळली आहेत. नाशिकमध्ये महापौर निवडणुकीत भाजप आणि मनसे (MNS supports BJP) एकत्र आली. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र येऊनही महापौरपद (MNS supports BJP)आपल्याकडे राखण्यात भाजपला यश आलं.  नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी (Nashik Mayor BJP Unopposed) बिनविरोध निवडून आले आहेत.

महत्त्वाचं म्हणजे नाशिक महापौर निवडणुकीत मनसेने भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश नगरसेवकांना दिले होते. मनसेने आपल्या 5 नगरसेवकांना बजावलेल्या व्हीपची एक्स्कलुझिव्ह कॉपी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.

महापौर निवडणुकीत भाजपचे महापौरपदाचे उमेदवार सतीश कुलकर्णी आणि उपमहापौरपदाचे उमेदवार भिकूबाई बागुल यांनाच मतदान करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा व्हीप मनसेने आपल्या नगरसेवकांना बजावला होता.

भाजप आणि मनसेच्या या जवळीकीमुळे राज्यात नवं समीकरण पाहायला मिळत आहे. हेच समीकरण आता नाशिक महापालिकेनंतर राज्याच्या राजकारणात पाहायला मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सतीश कुलकर्णी 16 वे महापौर

नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत अनोखे ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळाले. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी पुन्हा पक्षाला संकटातून तारत महापौरपद राखण्यास मदत केली. त्यामुळे नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी (Nashik Mayor BJP Unopposed) बिनविरोध निवडून आले आहेत.

नाशिकमध्ये महासेनाआघाडीत पहिल्याच निवडणुकीत ‘महा’फूट पडल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेला मतदान करण्याचा व्हीप बजावूनही काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने निवडणुकीतून माघार घेतली. सतीश कुलकर्णी हे नाशिकचे 16 वे महापौर ठरले आहेत.

महासेनाआघाडीत पहिल्याच निवडणुकीत महाफूट पडल्याचं दिसून आलं. शिवसेनेला मतदान करण्याचा व्हीप बजावूनदेखील काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेनेला माघार घ्यावी लागली. तर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा चमत्कार केल्याचं पाहायला मिळालं.

संबंधित बातम्या  

संकटमोचकांची किमया, नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी बिनविरोध 

Published On - 1:04 pm, Fri, 22 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI