Mosque Loudspeaker Issue : ‘छेडेंगे तो छोडेंगे नहीं’ म्हणत इशारा देणाऱ्या अब्दुल मतीन शेखानीचा शोध सुरु, मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा

‘हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’ असं वक्तव्य शेखानी यांनी जाहीरपणे केलं होतं. त्यानंतर आता मुंब्रा पोलिसांनी अब्दुल मतीन शेखानी यांच्यासह पीएफआयच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. आता मुंब्रा पोलीस अब्दुल मतीन शेखानी यांचा शोध सुरु केलाय.

Mosque Loudspeaker Issue : छेडेंगे तो छोडेंगे नहीं म्हणत इशारा देणाऱ्या अब्दुल मतीन शेखानीचा शोध सुरु, मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा
मुंब्रा पोलिसांकडून अब्दुल मतीन शेखानीचा शोध सुरु
Image Credit source: ANI
| Edited By: | Updated on: Apr 17, 2022 | 10:11 PM

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यावरुन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिक घेतलीय. राज यांनी ठाकरे सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. इतकंच नाही तर सरकारने मशिदींवरील भोंगे हटवलं नाही तर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेत. अशावेळी पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संस्थेच्या अब्दुल मतीन शेखानी (Abdul Matin Shekhani) यांनी मनसेला इशारा दिलाय. ‘हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’ असं वक्तव्य शेखानी यांनी जाहीरपणे केलं होतं. त्यानंतर आता मुंब्रा पोलिसांनी अब्दुल मतीन शेखानी यांच्यासह पीएफआयच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. आता मुंब्रा पोलीस अब्दुल मतीन शेखानी यांचा शोध सुरु केलाय.

मुंब्रा पोलिसांकडून अब्दुल मतीनचा शोध सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आज अब्दुल मतीन शेखानीच्या संबंधित ठिकाणावर पोलिसांनी चौकशी केली. मात्र अब्दुल मतीन हे पोलिसांना सापडले नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पोलिसांच्या दोन टीम अब्दुल मतीनचा शोध घेत आहेत. मतीनला लवकरच अटक करण्यात येईल असं पोलिसांचं म्हणणं आहे. या संदर्भात पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी काहीच बोलायला तयार नाहीत. शुक्रवारी मुंब्रामध्ये अब्दुल मतीन शेख यांनी एक सभा घेतली होती. परवानगी नसताना देखील त्यांनी गर्दी जमवली आणि गर्दी समोर आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. त्यानुषंगाने अब्दुल मतीनवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतीन यांचं वक्तव्य काय?

काही लोक वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत. काही लोकांना अजानची अडचण होतेय. काही लोकांना भोंग्यांची अडचण होतेय. काही लोकांना आपल्या मस्जिद आणि मदरशांची अडचण होत आहे. मी त्यांना एक सांगू इच्छितो, आम्हाला शांतता हवी आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा एक नारा आहे की हर मजदूर हमारा है. सोबतच आमचा दुसराही नारा आहे की, ‘हमको छेडो नहीं, हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’. येवढं लक्षात ठेवा की, एक मदरसा, एक मस्जिद, एकाही लाऊडस्पीकरवर तुम्ही हात लावण्याचा प्रयत्न केला तर सर्वात पुढे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया दिसेल, अशा शब्दात पीएफआयचे नेते अब्दुल मतीन शेखानी यांनी इशारा दिलाय.

इतर बातम्या : 

Raj Thackeray : ‘राज ठाकरेंना कोर्टाचा हवाला देत खोटं बोलण्याचा अधिकार नाही’, मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन कायदेतज्ज्ञांचं आव्हान

मुंबईतील बीकेसीत 40 व्या ‘हुनर हाट’चं उद्घाटन, ‘भेट द्या आणि एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेचा अनुभव घ्या’

Girgaon Chowpati Gallery : मुंबईकरांनो तुमची नवी दर्शक गॅलरी पाहा, गिरगाव चौपाटीच्या सौदर्यात भर