AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याआधीच त्यांचा खास माणूस मोदींच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?

राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी घडलेल्या घडामोडी पाहता त्याची प्रचिती समस्त मतदारांना आलेली आहे. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकूण तीन दिवस ते दिल्लीत असतील. आपल्या या दौऱ्यादरम्यान ते खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तसेच अन्य काही महत्त्वाची कामे ते दिल्लीत करणार आहेत.

मोठी बातमी! ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याआधीच त्यांचा खास माणूस मोदींच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?
narendra modi and uddhav thackeray
| Updated on: Aug 05, 2025 | 8:03 PM
Share

Uddhav Thackeray : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी घडलेल्या घडामोडी पाहता त्याची प्रचिती समस्त मतदारांना आलेली आहे. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकूण तीन दिवस ते दिल्लीत असतील. आपल्या या दौऱ्यादरम्यान ते खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तसेच अन्य काही महत्त्वाची कामे ते दिल्लीत करणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते खासदार राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याआधीच समोर महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर येत आहेत. उद्धव ठाकरे दिल्लीला जाण्याआधीच त्यांच्या पक्षाच्या एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याआधी त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यांनी सोमवारीच (4 ऑगस्ट) मोदींची ही भेट घेतली. या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. ही भेट आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. तर प्रियांका चतुर्वेदी यांनी ही भेट सहज होती. त्या भेटीमागचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण दिले आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना प्रियांका चतुर्वेदी यांनी मोदींच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीत येणार आहेत. याआधी माझी नरेंद्र मोदी यांच्याशी सहज भेट झाली. त्या भेटीत महाराष्ट्रावर कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच माझी भेट राजकारणाशी संबंधित नव्हती, असं स्पष्टीकरण प्रियांका चतुर्वेदी यांनी दिलंय.

उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा कसा असेल?

दरम्यान, येत्या 6 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्लीच्या विमानतळावर उतरतील. त्यानंतर ते संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. 6 ऑगस्ट रोजीच्याच संध्याकाळी उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते 6 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ते पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता संसदेतील पक्ष कार्यालयाला भेट देतील. दुपारी ते राजकीय गाठीभेटी घेतील. 7 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या डिनर आणि इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत नेमकं काय काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट