AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC Exam : परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर जोरदार राजकारण, वडेट्टीवार आणि मेटे आमनेसामने

या विषयावर आता जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि मंत्री विजय वडेट्टीवार हे या विषयावर आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

MPSC Exam : परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर जोरदार राजकारण, वडेट्टीवार आणि मेटे आमनेसामने
sagar joshi
sagar joshi | Updated on: Mar 11, 2021 | 4:59 PM
Share

मुंबई : MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्यानंतर पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, जळगावसह अनेक शहरात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. परीक्षा दोन दिवसांवर आली असताना ती पुढे ढकलण्याचा निर्णय योग्य नाही. ठरलेल्या तारखेलाच परीक्षा झाली पाहिजे अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत आहे. या विषयावर आता जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि मंत्री विजय वडेट्टीवार हे या विषयावर आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.(Allegations of Vinayak Mete and Vijay Vadettiwar after the decision to postpone the MPSC exam)

सरकारचा निर्णय योग्य- मेटे

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं. आहे. “महाराष्ट्र सरकारनं सध्या राज्यात कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन आणि सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा जो विषय प्रलंबित आहे, त्याचा विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय योग्य आहे. काही लोकांना तो निर्णय पसंत नसेल, त्यांच्या काही प्रतिक्रिया आल्या असतील किंवा येत असतील, पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की परीक्षा फक्त पुढे ढकलल्या आहेत, रद्द केलेल्या नाहीत. कोरोनाच्या परिस्थितीत अशा पद्धतीनं गोंधळ घालणंही योग्य नाही. पुढे लाखो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यांच्या जिवाला जर काही बरं वाईट झालं तर हे गोंधळ घालणारे जबाबदारी घेणार आहेत का? असा सवाल विनायक मेटे यांनी केलाय.

मेटेंकडून आगीत तेल ओतण्याचं काम – वडेट्टीवार

विनायक मेटे यांच्या या मताचा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतलाय. “विनायक मेटे हे आगीत तेल घालण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या 2- 3 वर्षांपासून 80 टक्के विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की, यावर मार्ग काढा, तोडगा काढा. आरक्षित जागा बाजूला ठेवून परीक्षा घेण्यास काहीच हरकत नाही”, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. त्याचबरोबर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

सरकारला घरचा आहेर

“एमपीएससीची परीक्षा अचनाकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीनं अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे”, अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

रोहित पवारांचा पुनर्विचाराचा सल्ला

“यापुढं कोरोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच MPSCची परीक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री साहेब आणि अजितदादा आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!” असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या : 

अधिवेशन आणि लग्न होतात मग MPSC परीक्षा का नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला घरचा आहेर

परीक्षा झालीच पाहिजे, रोहित पवार आग्रही, सरकारच्या निर्णयाचा निषेध, सत्यजीत तांबे आक्रमक

Allegations of Vinayak Mete and Vijay Vadettiwar after the decision to postpone the MPSC exam

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं