परीक्षा झालीच पाहिजे, रोहित पवार आग्रही, सरकारच्या निर्णयाचा निषेध, सत्यजीत तांबे आक्रमक

आयोगाच्या या निर्णयाविरोधात पुण्यातील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय.

परीक्षा झालीच पाहिजे, रोहित पवार आग्रही, सरकारच्या निर्णयाचा निषेध, सत्यजीत तांबे आक्रमक
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 4:21 PM

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आयोगाच्या या निर्णयाविरोधात पुण्यातील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारला या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे.(Reconsider decision to postpone MPSC exams, request of Rohit Pawar and Satyajit Tambe)

“एमपीएससीची परीक्षा अचनाकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीनं अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे”, अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

रोहित पवारांचा पुनर्विचाराचा सल्ला

“यापुढं कोरोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच MPSCची परीक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री साहेब आणि अजितदादा आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!” असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन, पडळकरांचा सहभाग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि शास्त्री रोडवर त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकरही सहभागी झाले आहेत. लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला आहे. लाठीमार करायला विद्यार्थी काय दहशतवादी आहेत का? असा सवाल पडळकर यांनी केलाय.

कोरोनाचं कारण देत परीक्षा पुढे ढकलल्या

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. राज्य शासनानं परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यामंध्ये संतापाचं वातावरण आहे. पोलिसांकडून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, विद्यार्थ्यांनी पोलिसांचं ऐकलं नाही. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

संबंधित बातम्या

Pune MPSC Student Protest LIVE | राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर, पुण्यात विद्यार्थी संतप्त, विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात गोपीचंद पडळकरांची एन्ट्री; रस्त्यावर आडवं पडून जोरदार घोषणाबाजी

Reconsider decision to postpone MPSC exams, request of Rohit Pawar and Satyajit Tambe

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.