भाई जगताप आणि पडळकरांमध्ये ‘ट्विटरवॉर’, UPSC परीक्षा आणि चक्रीवादळाच्या तडाख्यावरुन एकमेकांवर शरसंधान

| Updated on: May 18, 2021 | 2:19 PM

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पडळकरांवर जोरदार निशाणा साधला. पडळकरांनीही जगतापांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

भाई जगताप आणि पडळकरांमध्ये ट्विटरवॉर, UPSC परीक्षा आणि चक्रीवादळाच्या तडाख्यावरुन एकमेकांवर शरसंधान
मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर
Follow us on

मुंबई : MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर पुण्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांसह जोरदार आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता कोरोना प्रादुर्भावामुळे UPSC परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. त्यावरुन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पडळकरांवर जोरदार निशाणा साधला. त्यावर आता पडळकरांनीही चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर मुंबई महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर आणि पर्यायानं भाई जगतापांवर पलटवार केलाय. (Bhai Jagtap and Gopichand Padalkar criticize each other through twitter)

भाई जगताप यांचं खोचक ट्वीट

17 मे रोजी भाई जगताप यांनी एक ट्वीट करुन UPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर भाजपवर टीका केली. “राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे. केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत? आता दातखिळी बसली आहे का? #महाराष्ट्रद्रोही”, असं ट्वीट जगताप यांनी केलं आहे.

गोपीचंद पडळकर यांचं प्रत्युत्तर

भाई जगताप यांनी UPSC परीक्षेच्या निर्णयावरुन केलेल्या टीकेला गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. “नाव बदलल्याने जसे ‘#भाई’ होता येत नाही तसेच माझ्या महाराष्ट्राच्या बांधवांच्या वेदना समजता येत नाही. काल चक्री वादळात तुंबलेली मुंबई थांबली, पडली, झडली, खचली, तेव्हा आपण विरोधी पक्ष म्हणून कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली करत होता? #वसूली_सरकार”, अशा शब्दात पडळकर यांनी जगतापांवर पलटवार केलाय.

खाद्य तेलाच्या किमतीवरुनही जगतापांचा भाजपवर निशाणा

रासायनिक खते आणि खाद्य तेलाच्या किंमती मोठी वाढ झाली आहे. या भाववाढीवरुनही भाई जगताप यांनी पंतप्रधान मोदींवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केलीय. “काँग्रेस – ७० वर्षे खाद्यतेल ₹९०, भाजपा – ७ वर्षे खाद्यतेल ₹१७०, ७ वर्षात जवळ जवळ दुप्पट. आहे ना विकास?? मोदी है तो मुमकीन है”, असं ट्वीट जगताप यांनी केलंय.

संबंधित बातम्या :

जिल्हा जिंकला तर देश जिंकेल, मोदींचा जिल्हाधिकाऱ्यांना कानमंत्र; काळाबाजार रोखण्याचेही आदेश

मोठी बातमी: प्रताप सरनाईकांच्या शोधासाठी लोणावळ्यातील रिसॉर्टवर ईडी-सीबीआयची धाड

Bhai Jagtap and Gopichand Padalkar criticize each other through twitter