सत्तांतरानंतर बैठक सत्र! सेनाभवनात ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक, संध्याकाळी भाजप-शिंदे गटात बैठक

| Updated on: Jul 02, 2022 | 1:57 PM

शिवसेनेची बैठक, भाजप-शिंदेगटाचीही बैठक, सत्तांतरानंतर बैठक सत्र

सत्तांतरानंतर बैठक सत्र! सेनाभवनात ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक, संध्याकाळी भाजप-शिंदे गटात बैठक
उद्धव ठाकरे आणि शिंदे-फडणवीस
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्याचं राजकारण एका वेगळ्या वळणावर आलं. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. एकीकडे देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील आणि राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा सगळ्यांचा अंदाज असतानाच सगळ्यांचे अंदाज चुकवत भाजपच्या शीर्षनेतृत्वाने एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली. या राजकीय उलथापालथीमुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली. अश्यात उद्धव ठाकरे यांनी पक्ष पुन्हा नव्याने उभा करण्यासाठी कंबर कसली आहे. काल त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनाभवनात जात शिवसैनिकांशी संवाद साधला. तेव्हा मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. आता आजही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात बैठक पार पडत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या गोटातही बैठक पार पडत आहे.

शिवसेनेची बैठक

शिवसेना भवनमध्ये शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक पार पडतीये.ही बैठक सुरु झाली असल्याची माहिती आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. राज्यातल्या सगळ्या जिल्हा संपर्कप्रमुखांनी बैठकीला हजेरी लावली आहे.

भाजपच्या गोटात बैठक सत्र

जरी सरकार स्थापन झालं असलं तरी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवरचं संकट अद्याप टळलेलं नाही. प्रलंबित याचिकेवर 11 जुलैला सुनावणी होणार आहे. पण त्याआधी 4 किंवा 5 जुलैला मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. सोबतच अध्यक्षपदाच्या निवड उद्या होण्याची शक्यता आहे. या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आज भाजपची बैठक पार पडत आहे. आज संध्याकाळी सात वाजता भाजप आणि शिंदे गट आमदारांची संयुक्त बैठक होतेय. ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शिंदे गटाचे आमदार आज संध्याकाळपर्यंत मुंबईत येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

“एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मागच्या 11 दिवसांपासून एकनाथ शिंदे “आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आमचा गट हीच शिवसेना आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही झगडतोय”, असं त्यांनी वारंवार सांगितलं. कालच्या सेनाभवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.