AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : “एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत”, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
Image Credit source: tv9
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 01, 2022 | 2:38 PM
Share

मुंबई : “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मागच्या 11 दिवसांपासून एकनाथ शिंदे “आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आमचा गट हीच शिवसेना आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही झगडतोय”, असं त्यांनी वारंवार सांगितलं. पण आज उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. शिवसेनेला वगळून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. शिवसेनेला वगळून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. याशिवाय माझ्याशी असलेलं वैर मुंबईवर थोपवू नका, असं म्हणत मेट्रो कारशेड हलवू नका, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलंय.

“ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं, आणि ज्याने हे सरकार स्थापन केलं, कथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं. हेच मी अमित शाहांना सांगत होतो, अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री व्हावा, आताची जोडगोळी अशीच अडची वर्ष झाला असतो.. पहिल्या अडीच वर्षात याचा नाहीतर त्यांचा मुख्यमंत्री जाला. मग आता असं का केलं.. लोकसभा विधानसभेत एकत्र होतो. मग मला कशाला मध्ये मुख्यमंत्री बनायला लावलं… आता जे केलात ते तेव्हाच केलं असतं तर मविआ जन्मालाच आला नसता.. पाठीत वार करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही… हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही.. पहिल्या प्रथम तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल.. पण मुंबईच्या पाठीत वार खुपसू नका”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

“माझा राग मुंबईवर काढू नका”

कांजूरचा प्रस्ताव आहे, त्यात अहंकार नाही. माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा आग्रह उगाच रेटू नका. पर्यावरणाची हानी करणारा निर्णय घेऊ नका, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

जनतेचे आभार!

“महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा ऋणी आहे. अनपेक्षित आल्यानंतर तो पद सोडताना क्वचितच लोक रडतात, तुमच्या डोळ्यात जे अश्रू आहेत, तीच माझी ताकद, त्याच्याशी प्रतारणा करणार नाही, गद्दारी करणार नाही.विचित्र पद्धतीने शिवसेना प्रमुखांचा पुत्र उतरवून स्वतः मुख्यमंत्री बनण्याचा हा अट्टाहास त्यांनी केला.. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही… हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे”, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट