
मुंबई: वॉर्ड क्रमांक 119, या वॉर्डाचं नाव भारत नगर आहे. विक्रोळी स्टेशन (पूर्व), भारत नगर, राजीव गांधी नगर, विक्रोळी विद्यालय, अशोक नगर, जय भवानी चाळ, काळाघोडा रामवाडी या ठिकाणांचा या वॉर्डात समावेश होतो. गेल्या निवडणुकीत नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाच्या (NCP) श्रीमती रहाटे मनिषा हरिश्चंद्र यांचा या वॉर्डात विजय झाला होता. हा मतदारसंघ स्त्रियांसाठी राखीव मतदारसंघ आहे. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 22,989 वैध मतं होती. शिवसेनेच्या (Shivsena) हांडे सुनीता राजन यांचा या 2017 च्या निवडणुकीत काहीच मतांनी पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत (Election) हीच खरी मजा असणार आहे. उमेदवारांमध्ये चांगलाच सामना रंगणार आहे. त्यात राज्याच्या राजकारणात मोठे आणि महत्त्वाचे बदल झालेले आहेत त्यामुळे नेमकं काय होतंय हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
विक्रोळी स्टेशन (पूर्व), भारत नगर, राजीव गांधी नगर, विक्रोळी विद्यालय, अशोक नगर, जय भवानी चाळ, काळाघोडा रामवाडी या ठिकाणांचा या वॉर्डात समावेश होतो.
| पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
|---|---|---|
| शिवसेना | हांडे सुनीता राजन | - |
| भाजप | भास्कर संगीता सत्यवान | - |
| राष्ट्रवादी काँग्रेस | राहते मनिषा हरिश्चंद्र | राहते मनिषा हरिश्चंद्र |
| काँग्रेस | फुलारी पूजा विश्वनाथ | - |
| मनसे | सारंग जयश्री पांडुरंग | - |
| अपक्ष / इतर | - | - |
वैध मते – 22,989
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- 6979
शिवसेना- 6669
भाजप- 4039
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- 3656
मनसे- 1181
स्त्रियांसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात 2017 साली चांगलीच तोडीसतोड निवडणूक पाहायला मिळाली होती. या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (राष्ट्रवादी) आणि मनसे या पक्षांकडून अनुक्रमे संगीता भास्कर, पूजा फुलारी, सुनीता हांडे, मनीषा राहते, जयश्री सारंग उमेदवार उभे होते. या वॉर्डात मनसेच्या उमेदवाराला जयश्री सारंग यांना २०१७ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी फारशी पसंती दिली नव्हती. आकडेवारी जर नीट पाहिली तर जिंकलेला राष्ट्रवादीचा उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार यांच्या मतांमध्ये फार फरक नव्हता. राष्ट्रवादीच्या मनिषा राहतेंना 6979 मतं आणि शिवसेनेच्या सुनीता हांडेंना 6669 इतकी मतं होती म्हणजे अगदी थोड्याच मतांचा फरक होता. आता यावेळच्या निवडणुकीत या दोन पक्षांमध्येच काटे की टक्कर होईल की अजून तिसराच पक्ष मध्ये येईल हे बघण्याची मजा वेगळीच असणार आहे. शेवटी सगळं मतदार राजाच्या हातात आहे असं म्हणायला हरकत नाही.