BMC Election 2022 Malad East (Ward 44) वॉर्ड क्रमांक 44 च्या नगरसेविका संगीता ज्ञानमुर्ती शर्मा यांना यंदा करावी लागणार तारेवरची कसरत!

| Updated on: Jun 07, 2022 | 4:00 PM

2017मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. शिवसेना, भाजप आणि काँग्रसे व राष्ट्रवादीही स्वबळावर लढले होते. या निवडणुकीत मनसेही उतरली होती. त्यामुळे या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक पाहायला मिळाली होती. मात्र, या सर्वांवर मात करत संगीता ज्ञानमुर्ती शर्मा यांनी विजय मिळवला होता.

BMC Election 2022 Malad East (Ward 44) वॉर्ड क्रमांक 44 च्या नगरसेविका संगीता ज्ञानमुर्ती शर्मा यांना यंदा करावी लागणार तारेवरची कसरत!
Image Credit source: tv9
Follow us on

येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूक होणार आहे. त्यात अनेकांचे वॉर्ड आरक्षित झाले तर काहींचे वॉर्ड कायम राहिले आहेत. ज्यांचे वॉर्ड आरक्षित (ward reservation) झाले त्यांना दुसऱ्या वॉर्डाची शोधाशोध करावी लागत आहे. तर ज्यांचे वॉर्ड सुरक्षित राहिले त्यांच्यावर निवडणुकीत वॉर्ड राखण्याचं धर्मसंकट ओढवलं आहे. कारण मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार याची काहीच शाश्वती नाहीये. त्यामुळे सर्वच पक्षाचे नगरसेवक कामाला लागेल आहेत. भाजपच्या वॉर्ड क्रमांक 44 च्या उमदेवार संगीता ज्ञानमुर्ती शर्मा कामाला लागल्या आहेत. मागच्यावेळी त्यांनी दिग्गजांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट होती. त्यामुळे शहा विजयी होणार की या वॉर्डात दुसऱ्या पक्षाचा उमेदवार बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मागच्या निवडणुकीत काय घडलं?

2017मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. शिवसेना, भाजप आणि काँग्रसे व राष्ट्रवादीही स्वबळावर लढले होते. या निवडणुकीत मनसेही उतरली होती. त्यामुळे या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक पाहायला मिळाली होती. मात्र, या सर्वांवर मात करत संगीता ज्ञानमुर्ती शर्मा यांनी विजय मिळवला होता. मागच्या निवडणुकीमध्ये शर्मा यांच्या विरोधात शिवसेनेचे धानुका रंजना सुभाष, काँग्रेसच्या माने जानवी विपुल आणि मनसेच्या रेखा संजय सोनावण उभे होते. मात्र, शर्मा यांनी अचूक नियोजन आणि चांगला प्रचार करून विजय मिळवला होता.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

पाहा उमेदवारांना मत किती मिळाले

धानुका रंजना सुभाष – शिवसेना- 5550

हे सुद्धा वाचा

फडीया सुरेखा दिपक- अपक्ष- 53

नसरीन फहीम खान-ऑल इंडिया मजलिस इनेहदूल मुस्लिमीन- 2903

माने जानवी विपुल- नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-574

रुखसाना मेमन- समाजवादी पार्टी- 513

संगिता ज्ञानमूर्ती शर्मा- भारतीय जनता पार्टी- 9955

सिंग दीपा राणासंग्राम- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- 999

रेखा संजय सोनावणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना-408

मनिया सतीश वार्डे- बहुजन समाज पार्टी-1888