AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Kajupada Ward 11 | काँग्रेस-भाजपाला धूळ चारणारी शिवसेनेची वाघीण यंदाही डरकाळी फोडणार का? काय आहे वॉर्ड क्रमांक 11 चं गणित?

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीस सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुक लढवली होती. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते.

BMC Election 2022 Kajupada Ward 11 | काँग्रेस-भाजपाला धूळ चारणारी शिवसेनेची वाघीण यंदाही डरकाळी फोडणार का? काय आहे वॉर्ड क्रमांक 11 चं गणित?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 07, 2022 | 4:41 PM
Share

मुंबईः BMC Election2022 | ward 11  महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला लागले, तसं मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. मागील सहा महिन्यांपासून शिवसेना आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांचं युद्ध आपण अनुभवत आहोत. या सर्व राजकीय खलबतांचे पडसाद महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Mahapalika Election) मतदानावर दिसून येणार हे नक्की. या सर्वानंतरही मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 11चं गणितही तसंच आहे. मागील वेळी म्हणजेच 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेनं  (ShivSena)हा वॉर्ड जिंकला. शिवसेनेच्या उमेदवार रिद्धी भास्कर खुरसंगे (Riddhi khursunge) यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती. खुल्या प्रवर्गातून त्यांनी उमेदवारी लढवली होती. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करत रिद्धी खुरसंगे यांनी विजयी घोडदौड केली. त्यांनी भाजपचे प्रकाश दरेकर, काँग्रेसचे अशोक मेघाई यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राणे कृष्णाजी भाऊराव यांचा पराभव केला होता. आगामी महापालिका निवडणुकीत आता या वॉर्डात कोणत्या नगरसेवकाचं वर्चस्व असेल, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.   2017 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते.

वॉर्डमधील महत्त्वाचा भाग कोणता?

बोरीवली भागातील दौलत नगर, श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर आणि काजूपाडा हा भाग वॉर्ड क्रमांक 11 मध्ये येतो. मागील वेळी शिवसेनेनं येथील मतदारांची मनं जिंकलेली दिसून आली. मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला एकतर्फी मतं दिली.

मतदार संघाचा टक्का काय?

मुंबई महापालिकेच्या वॉक्र क्रमांक 11  मध्ये  2011 मधील जनगणनेनुसार, एकूण लोकसंख्या  58 लाख ९९६ एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जाती 2156 तर अनुसूचित जमाती 886 एवढी आहे. हा मतदार संघ खुल्या प्रवर्गात सुटला आहे.

मागील निवडणुकीत काय घडलं?

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीस सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुक लढवली होती. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. अपक्षांचीही संख्या कमी नव्हती. या सर्वांतून शिवसेनेच्या रिद्धी खुरसंगे यांनी बाजी मारली होती.

2017 मध्ये कुणाला किती मते?

  • रिद्धी खुरसंगे-  शिवसेना– 13,856
  • राजेश कासार- मनसे 1143
  • प्रकाश दरेकर- भाजपा– 7454
  • अशोक मेघई यादव- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 1463
  • कृष्णाजी राणे- राष्ट्रवादी– 322
  • नोटा- 429

यंदा वॉर्ड आरक्षित की खुला?

यंदा 2022 च्या महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 11 खुल्या प्रवर्गात आला आहे. तसेच खुल्या गटातून महिला उमेदवारासाठी हा वॉर्ड राखीव आहे.

पक्ष (Party)उमेदवार (Candidate)विजयी/ आघाडी (Win)
शिवसेना रिद्धी खुरसुंगे-
भाजप प्रकाश दरेकर-
राष्ट्रवादीकृष्णाजी राणे-
काँग्रेसअशोक मेघई यादव-
मनसेराजेश कासार-
अपक्ष/इतर- -

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?