BMC Election 2022 Ward 64 : शिवसेना पुन्हा विजय मिळवणार? वॉर्ड क्रमांक 64 मध्ये शाहीदा खान याचं भवितव्य काय?

| Updated on: Jun 09, 2022 | 6:55 PM

शाहिदा हारून खान या गृहिणी असून त्याचे पती हारून खान 25 वर्षांपूर्वी सेनेत कार्यरत झाले आहेत. ते गेल्या 15 वर्षांपासून आंबोलीत शाखाप्रमुख आहेत. “या प्रभागात मुस्लिम लोकसंख्या केवळ 35% आहे आणि MIM आणि सेना वगळता प्रत्येक पक्षाने हिंदू उमेदवार उभे केले होते.

BMC Election 2022 Ward 64 : शिवसेना पुन्हा विजय मिळवणार? वॉर्ड क्रमांक 64 मध्ये शाहीदा खान याचं भवितव्य काय?
शिवसेना पुन्हा विजय मिळवणार?
Image Credit source: tv9
Follow us on

 मुंबई: शिवसेनेच्या दोन मुस्लिम उमेदवार प्रभाग 64 (Ward 64) आंबोली-जोगेश्वरी मधील शाहिदा हारून खान आणि प्रभाग 96 बेहरामपाडा मधील हाजी हलीम यांचा विजय हा शिवसेनेसाठी स्पेशल होता. हाजी हलीम हे मुस्लिम बहुल बेहरामपाडा येथील सामाजिक कार्यकर्ता आहेत, वांद्रेमधील एक विस्तीर्ण झोपडपट्टी, 1993 च्या दंगलीत सर्वात जास्त झळ बसलेल्या भागांपैकी एक या भागातून ते येतात. तर दुसरीकडे जोगेश्वरीतून शिवसेनेचा किल्ला शाहीदा खान यांनी लढवला आणि या निवडणुकीत (BMC Election 2022)सहज विजय मिळवला. तसेच त्यांच्या कोरोनाकाळातील कामाचेही बरेच कौतुक झाले होते. शाहिदा हारून खान ((Shahida Harun Khan) या गृहिणी असून त्याचे पती हारून खान 25 वर्षांपूर्वी सेनेत कार्यरत झाले आहेत. ते गेल्या 15 वर्षांपासून आंबोलीत शाखाप्रमुख आहेत. “या प्रभागात मुस्लिम लोकसंख्या केवळ 35% आहे आणि MIM आणि सेना वगळता प्रत्येक पक्षाने हिंदू उमेदवार उभे केले होते. मात्र तरीही शिवसेनेने हा गड सहज खेचून आणला.

सेना यावेळीही समतोल राखण्यात यशस्वी होणार?

शिवसेना हा कोणत्याही जातीपातीचा पक्ष नाही. सेनेत मुस्लिमांपासून सर्वांना प्रतिनिधीत्व मिळते असे, शिवसेना नेते पहिल्यापासून सांगत आलेत. मात्र यावेळीही सेना तो समतोल राखण्यात यशस्वी ठरणार की यावेळचं चित्र पाटलटणार हेही पाहणं तितकचं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर हिंदुत्वावरून सतत आरोप होत आहेत. तसेच दुसरीकडे शिवसेनेही आमचं हिंदूत्व स्वच्छ आहे, असे वारंवार सांगत आहे. मात्र अलिकडेच सपाचे नेते आबु आझमी यांनी शिवसेनेने मुस्लिम आरक्षण आणि अल्पसंख्याच्या विकासावरून शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावेळी अल्पसंख्यात मतदार सेनेला कसा प्रतिसाद देणार ही तर निवडणुकीनंतच कळेल.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

महिला राखीव मतदारसंघ असल्याने फायदा

मी तळागाळातील कार्यकर्ती असल्याने आणि हा महिलांसाठी राखीव प्रभाग बनला असल्याने, माझ्या समर्थकांनी मला येथून माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याची सूचना केली,” हारून खान म्हणाले. तेव्हापासून हा गड शिवसेनेच्या ताब्यात आहे. तर दुसरे मुस्लिम उमेदवारव हाजी हालीम यांना सपा आणि एमआयएमनेही त्यांना तिकीट देऊ केले होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षच त्यांना बेहरामपाड्याचा विकास करेल, असा त्यांचा विश्वास होता. सेनेला येथे कधीही 200 पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत, परंतु मला 4,050 मिळाली आणि 350 मतांनी विजयी झालो. मुस्लिमांनी सेनेच्या उमेदवारावर विश्वास ठेवला आहे, अशा शब्दात गेल्या विजयानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला होता. यावेळी हे दोन्ही गड राखण्याचे आव्हान सेनेपुढे असणार आहे.