सर्वात मोठी बातमी ! भाजपच्या विजयाचा नारळ फुटला, सलग दुसरा विजय ? कोणत्या महापालिकेत उधळला विजयाचा गुलाल ?
BJP 2nd Corporator Won : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महानगर पालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा नारळ फुटला असून त्यांचा उमेदवार विजयी झाला आहे. कोणत्या महापालिकेतून, कोण जिंकलं ? सविस्तर माहिती जाणून घेऊया..

सुनील जाधव, प्रतिनिधी : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला अजून 15 दिवस बाकी आहेत. 15 जानेवारीला मतदान तर 16 ला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. प्रत्येक पक्षाकडून अर्ज मिळालेल्या उमेदवारांनी काल निवडणुकीसाठी अर्ज भरला, मात्र काहींनी एबी फॉर्म न मिळाल्याने अनेकांची निराशा झाली. काही जण नाराज झाले, तर काही थेट दुसऱ्या पक्षाचीही वाट धरली. निवडणूक उमेदवारी, अर्ज भरण्याची लगबग ही सगळी रणधुमाळी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. महानगर पालिकांच्या निवडणुकीत भाजपच्या विजया नारळ फुटला असून सलग दुसरा उमेदवार विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे प्रकरण ? चला जाणून घेऊया.
भाजपने उधळला विजयाचा गुलाल ?
कल्याण-डोंबिवली महापालिकsत भारतीय जनता पक्षाने विजयाचं खातं काल उघडलं होतं, आज भाजपचा दुसरा विजय झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक 26 क मधून भारतीय जनता पक्षाच्या आसावारी नवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत भाजपने खातं उघडत दुसरा विजय मिळवला आहे.
आज होणार कागदपत्रांची पडताळणी
एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने आसावरी नवरे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र असं असलं तरी आज कागदपत्रांची तपासणी होणार असून त्यांच्या दस्तावेजांची पडताळणी नंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
यापूर्वी कालही कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराची निवड झाल्याने पहिला विजय मिळाल्याची माहिती समोर आली होती. कल्याण पूर्वेतील 18 अ प्रभागात भाजपच्या रेखा राजन चौधरी या जवळपास बिनविरोध झाल्या. 18 अ प्रभागात ओबीसी महिला आरक्षित जागेसाठी भाजपच्या रेखा चौधरी याचा एकच अर्ज आल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यांच्याही कागपत्रांची आज पडताळणी होणार असून त्यानंतर विजयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरी रेखा चौधरी यांची विजय निश्चित मानला जातोय.
त्यामुळे निवडणुकीच्या आधीच कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे एकूण 2 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे दिसत आहे. भाग क्रमांक 18 मधून रेखा चौधरी आणि प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी केदार नवरे यांचा बिनविरोध विजय झाला आहे. त्यामुळे भाजपामध्ये उत्साहाचे , जल्लोषाचे वातावरण आहे. आज कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
