BMC Election 2022 Pushpa Park (Ward 36) 2017 साली भाजपाचा निसटता विजय; यंदा शिवसेना बाजी मारणार?

| Updated on: Jun 16, 2022 | 8:55 PM

महापालिकेच्या वार्ड क्रमांक 36 मध्ये पुष्पा पार्क गौतम नगर, सीओडी, शांतारामपाडा, रहेजा कॉम्प्लेक्स या भागांचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत या वार्डमधून भाजपाच्या उमेदवार दक्षा पटेल या विजयी झाल्या होत्या.

BMC Election 2022 Pushpa Park (Ward 36) 2017 साली भाजपाचा निसटता विजय; यंदा शिवसेना बाजी मारणार?
Follow us on

मुंबई : महापालिकेच्या वार्ड क्रमांक 36 मध्ये पुष्पा पार्क गौतम नगर, सीओडी, शांतारामपाडा, रहेजा कॉम्प्लेक्स या भागांचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत (BMC election) या वार्डमधून भाजपाच्या (BJP) उमेदवार दक्षा पटेल यांनी बाजी मारली होती. त्यांना एकूण 11692 मते पडली. त्यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) उमेदवार स्वाती गुजर यांचा पराभव केला. स्वाती गुजर यांना एकूण 10052 मते मिळाली. या वार्डामधून गेल्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये अटीतटीची लढत झाल्याचे पहायला मिळाले. अवघ्या काही मतांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. या वार्डामधून तीन नंबरला काँग्रेस पक्ष राहिला. काँग्रेसच्या उमेदवार दीक्षिता शाह यांना एकूण 3009 मतं मिळाली. तर मनसेच्या उमेदवार गीता फारकामे यांना 2829 मतं मिळाली. यंदाच्या निवडणुकीमध्ये देखील या प्रभागात शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस पहायला मिळण्याची शक्यता आहे. आघाडी झाल्यास मात्र ही निवडणूक भाजपाला जड जाऊ शकते.

एक नजर आकड्यांवर

या वार्डमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये अटीतटीची लढत झाली. भाजपाच्या उमेदवार दक्षा पटेल या विजयी झाल्या दक्षा पटेल यांना एकूण 11692 मते पडली. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार स्वाती गुजर यांचा पराभव केला. स्वाती गुजर यांना एकूण 10052 मते मिळाली. या वार्डातून तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या उमेदवार दीक्षिता शाह या होत्या त्यांना एकूण 3009 मतं मिळाली. तर मनसेच्या उमेदवार गीता फारकामे या चौथ्या क्रमांकावर होत्या त्यांना एकूण 2829 मतं मिळाली. तर अपक्ष उमेदवार भाग्यश्री धामणस्कर यांना एकूण 444 मतं मिळाली. या वार्डामधून राष्ट्रवादीने आपला उमेदवार उभा केला नव्हता.

एकूण किती मतदान झाले?

2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये या वार्डात एकूण 28692 इतके मतदान झाले. त्यापैकी भाजपाच्या उमेदवार दक्षा पटेल यांना एकूण 11692 मते पडली. तर शिवसेनेच्या उमेदवार स्वाती गुजर यांना एकूण 10052 मते मिळाली. या वार्डामधून गेल्या निवडणुकीत एकूण 483 मतं ही नोटोला झाली आहे.

हे सुद्धा वाचा

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनास्वाती गुजर-
भाजपदक्षा पटेल दक्षा पटेल
राष्ट्रवादी काँग्रेस --
काँग्रेस दीक्षिता शाह -
मनसेगीता फारकामे-
अपक्ष/ इतर भाग्यश्री धामणस्कर -

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

या वार्डामध्ये पुष्पा पार्क गौतम नगर, सीओडी, शांतारामपाडा, रहेजा कॉम्प्लेक्स या भागांचा समावेश होतो.

…तर भाजपाला वार्ड राखणे अशक्य

2017 साली झालेल्या निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या वार्डामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस दिसून येते. भाजपाच्या उमेदवार दक्षा पटेल यांनी अवघ्या काही मतांनी शिवसेनेच्या उमेदवार स्वाती गुजर यांचा पराभव केला. मात्र यंदा जर महापालिकेसाठी आघाडी झाली तर ही जागा पुन्हा जिंकणे भाजपासाठी कठिण असणार आहे. तसेच या वार्डामधून गेल्यावेळी शिवसेनेचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे यंदा हा वार्ड जिकांयचाच या निर्धाराने शिवसेना मैदानात उतरण्याची शक्यता आहे.