नाल्यावरील तरंगता गाळ काढण्यासाठी 47 कोटीचं कंत्राट, हा गाळ कुणाच्या खिशात जाणार?, शेलार पुन्हा आक्रमक

पावसाळा सुरु झाला असतानाही नाल्यावरील तरंगता गाळ काढण्यासाठी कंत्राट देण्यात आलंय. त्यावरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आता हा तरंगता गाळ कुणाच्या खिशात जाणार? असा सवाल केलाय.

नाल्यावरील तरंगता गाळ काढण्यासाठी 47 कोटीचं कंत्राट, हा गाळ कुणाच्या खिशात जाणार?, शेलार पुन्हा आक्रमक
आशिष शेलार, भाजप आमदार
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 6:06 PM

मुंबई : मुंबईतील नाालेसफाईवरुन भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आता पावसाळा सुरु झाला असतानाही नाल्यावरील तरंगता गाळ काढण्यासाठी कंत्राट देण्यात आलंय. त्यावरुन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आता हा तरंगता गाळ कुणाच्या खिशात जाणार? असा सवाल केलाय. यापूर्वीही आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी मुंबईतील नाल्यांची पाहणी केली होती. तसंच या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार हल्लाही चढवला होता. (Ashish Shelar criticizes ShivSena on the issue of Nalesafai in Mumbai)

107 टक्के नालेसफाई तर गाळात गेली. आता फ्लोटिंग म्हणजे तरंगता गाळ काढण्यासाठी 47 कोटीचं कंत्राट दिलं जात आहे. याचा अर्थ याआधी मुंबई महापालिका नाल्यातील रुतलेला गाळ, नाळ्याच्या वर दिसणारा गाळ, नाल्यावरील तरंगता गाळ काढण्यासाठी जे खर्च करत होते आणि कंत्राटदाराला मलिदा देत होते. त्यात अजून 47 कोटीची भर ही शिवसेनेची महापालिका टाकतेय. हा गाळ कुणाच्या खिशात चाललाय? गाळाच्या निमित्ताने कंत्राटदाराला मिळणाऱ्या मलिद्यातील वाटेकरी कोण आहेत? हे शिवसेनेनं स्पष्ट करावं, असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका अर्थात शिवसेनेवर केलाय.

‘वेलारासू नावाचा राक्षस आ वासून बसलाय’

आशिष शेलार यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील नालेसफाईची पाहणी केली होती. त्यावेळी बोलताना मुंबईत नालेसफाई झालीच नाही. नाल्यात गाळ रुतलेला आहे. गाळाचं बेटं तयार झाली आहेत. नाल्यावर शेती करावी अशी झाडं-झुडपं अभी आहेत. 100 टक्के नालेसफाईचा दावा हा बिलं काढण्यासाठी आहे. मुंबईच्या नालेसफाईत आता कट आणि कमिशन दोन्ही सुरु झालं आहे. यात प्रशासनाचे अधिकारीही जबाबदार आहे. पी. वेलारासू नावाचा राक्षस पालिका अधिकारी म्हणून फिरत आहे. तो आ वासून स्वत:ची वाहवा करत आहे. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांचं त्याला समर्थन आहे, अशी घणाघाती टीका शेलार यांनी केलीय. तसंच यांना मुंबईकरांसमोर उघडं करणं हे भाजपचं काम असल्याचं शेलार यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या :

सचिन वाझे आणि नालेसफाईच्या कनेक्शनची चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी

Mumbai Rains : म्हणून मुंबई तुंबणारच, महापालिका आयुक्त चहल यांनी कारण सांगितलं!

Ashish Shelar criticizes ShivSena on the issue of Nalesafai in Mumbai