
मुंबई | 17 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुमचं कार्य माझ्यासाठी प्रेरणादायी आहे, असं म्हणत बावनकुळे यांनी मोदींच्या कार्याचं कौतुक केलंय. तसंच त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. मर्मबंधातली ठेव ही… तुमचं कार्य माझ्यासाठी प्रेरणादायी, बोधप्रद, अभिमानास्पद आहे, असं म्हणत बावनकुळे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मोदींच्या कार्याचं कौतुक केलं आहे. एक व्हीडिओही चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेअर केलाय.
मर्मबंधातली ठेव ही !
संसदेच्या प्रवेशद्वारात, पायरीवर डोके टेकवून नमस्कार करीत असलेले नरेंद्र मोदीजी.. मी माझ्या डोळ्यांत साठवून ठेवले. राज्यघटनेला वंदन करणारे मोदीजी माझ्या मन:पटलावर कायमचे कोरले गेले…
अगदी परवा, चांद्रयान मोहीम फत्ते झाली त्यावेळी शास्त्रज्ञांसमोर हात जोडून ‘मला तुमचे दर्शन करायचे होते; त्यासाठी मी आलो.’ असे विनम्रपणे सांगून नतमस्तक झालेले पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी म्हणजे जगाला लाभलेले वैज्ञानिक अधिष्ठान आहे.
हे सारे बघतो तेव्हा मला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी म्हणजे माझ्या आयुष्याला मिळालेली दैवी देणगी आहे, याची जाणीव होते.
भारताच्या पराक्रमी भव्य ललाटावर सुवर्णाक्षरांनी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी हेच नाव कोरलेले आहे.. ‘ न भूतो ‘असा भारतमातेचा जयजयकार या सुपुत्राने जगभर गर्जवला आहे.
राष्ट्रतेजाने लखलखणाऱ्या या किमयागार नेत्याचे विलक्षण प्रभावी नेतृत्व समस्त भारतीयांना लाभले आहे, याचा सार्थ अभिमान आहे. म्हणूनच आज, त्यांच्या जन्मदिनी मनःपूर्वक शुभेच्छा देताना कोटी कोटी कमलपुष्पाचा वर्षाव मी त्यांच्यावर करतो. मा. मोदीजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
परिश्रम, धैर्य, चिकाटी व आत्मविश्वासाने मोदीजींनी भारताला ज्या उंचीवर नेले, ही साधारण गोष्ट नाही. हा भारतीय सामर्थ्याचा शंखनाद आहे. विशाल ध्येय ठेवून देशबांधवांसाठी उल्लेखनीय कार्य केले पाहिजे, देशाच्या कल्याणासाठी आपला जन्म सार्थकी लागावा, जनतेच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत, देशाची भरभराट व्हावी, सुख-समृद्धी नांदावी, यासाठी आपला देह कारणी यावा, हा मनोदय करूनच मा. मोदीजी अखंडपणे देशसेवा करत आहेत. आपली प्रत्येक कृती देशाला आत्मनिर्भर करू शकते, ही भावना प्रत्येक भारतीयांच्या मनात त्यांनी रुजवली.फक्त देशहिताचाच ध्यास धरला.
राष्ट्र प्रथम हा मंत्र हृदयात साठवला.!! मा. मोदीजी, जनतेला पक्के ठाऊक आहे ; आव्हान कितीही मोठे आणि कठीण असेना त्याचा निर्विवाद सामना आपणच करणार. आपल्या हेतू आणि कृतीवर या देशातील जनतेचा अढळ विश्वास आहे.
आपल्याला जन्मदिनाच्या पुनःश्च मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला निरामय दीर्घायुरारोग्य लाभो, ही प्रार्थना.
आपले कार्य माझ्यासाठी प्रेरणादायी, बोधप्रद, अभिमानास्पद आहे.
अनंत शुभेच्छा
मर्मबंधातली ठेव ही !
संसदेच्या प्रवेशद्वारात, पायरीवर डोके टेकवून नमस्कार करीत असलेले @narendramodi जी.. मी माझ्या डोळ्यांत साठवून ठेवले. राज्यघटनेला वंदन करणारे मोदीजी माझ्या मन:पटलावर कायमचे कोरले गेले ..
अगदी परवा, चांद्रयान मोहीम फत्ते झाली त्यावेळी शास्त्रज्ञांसमोर हात… pic.twitter.com/0K02Gnn4nc
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) September 16, 2023