“धोकेबाज म्हणून ज्याचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलंय, त्या जनाब उद्धव ठाकरेंना शुभेच्छा!”

Mohit Kamboj on Uddhav Thackeray Birthday : उद्धव ठाकरेंचा वाढदिवस म्हणजे धोकेबाज दिवस!; वाढदिवसाच्या दिवशी भाजप नेत्याकडून कडवट शुभेच्छा

धोकेबाज म्हणून ज्याचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलंय, त्या जनाब उद्धव ठाकरेंना शुभेच्छा!
Image Credit source: Uddhav Thackeray FB
| Updated on: Jul 27, 2023 | 12:41 PM

मुंबई | 27 जुलै 2023 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.शिवसेनेच्या नेत्यांनाी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच महाविकास आघाडीतील नेत्यांनीही त्यांना सदिच्छा दिल्या आहेत. अशातच भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या खऱ्या पण या शुभेच्छांमध्ये टोले आणि टोमणे पाहायला मिळत आहेत. भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या शुभेच्छा देत असताना त्यांनी धोकेबाज संबोधलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात धोकेबाज आणि संधीसाधूपणामध्ये ज्यांचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं गेलं आहे. त्या जनाब उद्धव ठाकरेजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.

आजचा दिवस धोकेबाज दिवस म्हणून महाराष्ट्र सरकारने घोषित केला पाहिजे, असंही मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आणखी एक ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे. राष्ट्रीय टोमणे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!, असा टोला मोहित कंबोज यांनी लगावला आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंनी शुभेच्छा देताना केली टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो. आयुष्य मंगलमय राहो. शतायुषी होवो…, असं म्हणत बावनकुळे यांनी ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना टोला लगावला आहे. आजच्या दिवशी सुद्धा विश्वगुरू यांच्याबद्दल त्यांनी चुकीची विधान केली आहेत. त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. त्याला अल्झायमर म्हणतात. याआधी उद्धव ठाकरे यांनी मोदींचा उल्लेख अनेकदा केला आहे. त्यांची प्रशंसा केली आहे. आता ते हे सगळं विसरलेत, असं म्हणत बावनकुळे यांनी टीका केली आहे.

भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. जागतिक ‘गद्दार’ दिवसाच्या शुभेच्छा!, असं ट्विट करत नितेश राणे यांनी टीका केली आहे.