Look Out Notice: प्रवीण कलमेंविरोधात लूकआऊट नोटीस; कलमेंना पोलीस दुबईतून खेचून आणणार, किरीट सोमय्यांचा विश्वास

| Updated on: Jul 02, 2022 | 2:23 PM

Look Out notice to Pravin Kalame: SRA मधून कागदपत्रे चोरल्याच्या आरोपानंतर अखेर मुंबई पोलिसांनी प्रवीण कलमे यांच्याविरोधात अजामीनपात्र लूक आऊट नोटीस जारी केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत याविषयीची माहिती दिली. तसेच कलमे हे दुबईत लपून बसलेले असून पोलीस त्यांनी तिथून खेचून मुंबईत आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Look Out Notice: प्रवीण कलमेंविरोधात लूकआऊट नोटीस; कलमेंना पोलीस दुबईतून खेचून आणणार, किरीट सोमय्यांचा विश्वास
भाजपा नेते किरीट सोमय्या
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

SRA मधून कागदपत्रे चोरल्याच्या आरोपानंतर अखेर मुंबई पोलिसांनी प्रवीण कलमे (Pravin Kalame) यांच्याविरोधात अजामीनपात्र लूक आऊट नोटीस (non bailable look out notice) जारी केली. केंद्रीय गृहखात्याने याविषयीचे पत्र पाठवत तपासाबाबत माहिती विचारली होती. ब्युरो ऑफ इम्मिग्रेशनने या 27 जून रोजी मुंबई पोलिसांना याविषयीची विचारणा केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात मुंबई पोलिसांनी आज कलमेंविरोधात अजामीनपात्र लूक आऊट नोटीस बजावल्याचे सांगितले. तसेच कलमे हे दुबईत लपून बसलेले असून पोलीस त्यांनी तिथून खेचून मुंबईत आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या दहा महिन्यांपासून कलमे यांच्याविरोधात कलमे यांच्यावर कारवाई करावी यासाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुन्हा आरोपांची राळ उडवून दिली. सरकार बदलताच दुस-या दिवशी कलमे यांच्याविरोधात कारवाईचा फास आवळल्या गेला हे विशेष.

पुन्हा आरोपांची राळ

प्रवीण कलमे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात आहे. अनिल परब यांचा जवळचा तर जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे असल्याचा पुन्हा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. कलमे यांच्यामार्फत ठाकरे यांनी वसुली केल्याचा पुनर्उच्चार त्यांनी केला. गेल्या दहा महिन्यांपासून कलमेंविरोधात कारवाईसाठी आपण पाठपुरावा करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच कलमे हे दुबईत लपून बसले आहेत. मुंबई पोलीस लवकरच कलमे यांना दुबईतून खेचून आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत प्रवीण कलमे?

प्रवीण कलमे हे मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते आहेत. अर्थ या सामाजिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनुसार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण विभाग, एसआरए तसेच म्हाडा या संस्थांमध्ये काम करणाऱ्या बिल्डरांकडून 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश प्रवीण कलमे यांना दिले आहेत.प्रवीण कलमे हे गृहनिर्माण विभाग, एसआरए तसेच म्हाडा या सरकारी संस्थांमधील सचिन वाझे आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी एप्रिल 2021 मध्ये केला होता.त्यानंतर प्रवीण कलमे आणि अर्थ या सामजिक संस्थेने किरीट सोमय्यांविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर शिवडी न्यायालयानं 15 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला होता. प्रवीण कलमे यांच्याविरोधात एसआरएने एप्रिलमध्ये एफआयआर दाखल केला होता. ते फरार असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची विनंती सोमय्या यांनी केली होती.