बंबई मे मेला है, बुलाया है… पुण्यातून निघाले मजूर, पहा गर्दी कुठे जातेय? tv9 पोलखोल!

| Updated on: Oct 05, 2022 | 3:48 PM

संख्याबळ कुणाचं जास्त, हे ठरवण्यासाठी दसरा मेळाव्याची गर्दी मापली जाणार असेल तर या बातमीतलं सत्य प्रत्येकापर्यंत पोहोचलंच पाहिजे....

बंबई मे मेला है, बुलाया है... पुण्यातून निघाले मजूर, पहा गर्दी कुठे जातेय? tv9 पोलखोल!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अभिजित पोते, पुणेः मुंबईत शिवसेनेच्या (Shivsena) दोन मेळाव्यांसाठी अनेक ठिकाणांहून गर्दीच जमा केलीय जातेय, असा आरोप होतो. टीव्ही9 मराठीने याची शहानिशा करायची ठरवलं. पुण्यातून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश केला. यात उत्तर प्रदेशातून पुण्यात कामासाठी आलेले मजूर होते. त्यांना ट्रॅव्हल्समध्ये बसवलं होतं, पण आपण कुठे निघालोयत, हे माहितीच नव्हतं. रिपोर्टरने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी एवढी भाबडी उत्तरं दिली की, शिवसेना, ठाकरे, शिंदे, बीकेसी, शिवाजी पार्क, शिवसैनिक या कशाशीच त्यांना अर्थार्थी संबंध नव्हता हेच दिसून आलं. पुण्यात आम्ही ज्याची चौकशी केली, ती ट्रॅव्हल्स निघाली होती बीकेसी (BKC) ग्राउंडवर… जिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (CM Eknath Shinde) दसरा मेळावा आयोजित करण्यात आलाय.

या मजूरांना विचारलं तुम्ही कुठून आलाय? म्हणाले, कच्छ नगर से लाया गया है

कहाँ जा रहे हो— बंबई- शिवाजी नगर

क्यूँ- मुख्यमंत्री जी की रॅली है.. उधर जा रहा है…

दशहरे का मेला देखने चलो, ऐसा बोला है…

कुणाचा मेळावा आहे, असं विचारलं असता, एक तो उन के भाई है… और दुसरे ये है… तो राज ठाकरे जी के समर्थन में जा रहे है…

 

दुसऱ्या एका मजुराला विचारलं तर तो म्हणाला… आम्हाला फक्त सांगितलंय गाडी फ्री है.. मुंबई घुमना है…

यातील काही लोक उत्तर प्रदेश, बिहार बंगालहून आलेले चौकशीतून उघड झालंय. आम्हाला फिरायला मुंबईला चला म्हणून ट्रॅव्हल्स मध्ये बसवल्याचं या लोकांनी सांगितलं. शिंदे गटाच्या मेळाव्याला गर्दी करण्यासाठी पुण्यातून पर राज्यातील कामगारांना घेऊन ट्रॅव्हल्स निघाल्याचं आढळून आलं.