AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनुष्यबाण कुणाचं? येत्या 48 तासांत कोणत्याही क्षणी निर्णय येण्याची शक्यता

धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठी अपडेट! 7 ऑक्टोबर आधीच धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय होणार?

धनुष्यबाण कुणाचं? येत्या 48 तासांत कोणत्याही क्षणी निर्णय येण्याची शक्यता
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 05, 2022 | 3:05 PM
Share

दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena Latest News) धनुष्यबाण (Dhanush Ban sign) चिन्हाबाबत महत्त्वाची बातमी समोर आलीय. धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय येत्या 48 तासांत कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. 7 ऑक्टोबर आधीच केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) धनुष्यबाण चिन्हाबाबत आपला निर्णय देईल, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळे येत्या 48 तासांत धनुष्यबाण चिन्ह हे कुणाला मिळतं, हे लवकरच स्पष्ट होईल, असं सांगितलं जातंय.

धनुष्यबाण चिन्हाबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी शिवसेनेला निवडणूक आयोगाने दिलेली मुदतही आज संपतेय. शिवसेना पक्षासोबत शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावरही दावा केला होता. त्यामुळे हा वाद अखेर आता निवडणूक आयोगाच्या दारात उभा ठाकलाय. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत नेमका काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुरु आहे. मागच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने धनुष्यबाण चिन्हाबाबत कारवाई करण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली होती. त्यानंतर निवडणूक आयोग आता सक्रिय झालंय.

एकीकडे अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झालीय. या निवडणुकीतही ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष होण्याची शक्यताय. तर दुसरीकडे त्याआधी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा फैसला होणंही गरजेचं आहे.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी विधानसभेची जागा रिक्त झाली होती. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या कार्यक्रमानुसार, येत्या 14 ऑक्टोबरपासून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केले जातील. तर 3 नोव्हेंबरला मतदान होऊन तर 6 नोव्हेंबरला अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीआधीच धनुष्यबाण चिन्हाचा फैसला होणं गरजेचं असल्याचंही मत जाणकारांनी व्यक्त केलंय. त्यानुसार शिंदे विरुद्ध ठाकरे या लढाईत धनुष्यबाण चिन्हाबाबत काय निर्णय होतो? धनुष्यबाण चिन्ह शिंदे किंवा ठाकरे या दोघांपैकी कुणाला एकाला मिळणार? की धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.