Beed| बीडमध्ये मुस्लिम महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, कारण काय?

बीड शहरासह परळीत तहसील कार्यालय परिसरात महिलांनी हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला. बिल्किस बानो प्रकरणासह इतर विषयांवरील निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं.

महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Sep 15, 2022 | 2:53 PM

बीडः बीड जिल्ह्यातील 11  तालुक्यातील मुस्लिम महिलांनी आज आंदोलन केलं. बिल्किस बानो (Bilkis Bano) प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शेकडो महिलांनी (Muslim Women) मूक मोर्चा (Beed Morcha) काढला. बीड शहरात मोठ्या संख्येने मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला. परळी तहसील कार्यालयाबाहेरही मुस्लिम बांधवांनी एकत्र येत या प्रकरणाचा निषेध केला. परळीत तहसील कार्यालय परिसरात महिलांनी हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त केला. बिल्किस बानो प्रकरणासह इतर विषयांवरील निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें