Nagar Panchayat Election Result : गोपीचंद पडळकरांच्या खानापूर नगर पंचायतीत भाजपला भोपळा!

| Updated on: Jan 19, 2022 | 10:49 PM

खानापूर नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना-काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्या आहेत. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आलाय. मात्र, भाजपला याठिकाणी एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना आघाडीचं नेतृत्व आमदार अनिल बाबर यांच्या खांद्यावर देण्यात आलं होतं. तर भाजपची जबाबदारी गोपीचंद पडळकर यांच्या खांद्यावर होती.

Nagar Panchayat Election Result : गोपीचंद पडळकरांच्या खानापूर नगर पंचायतीत भाजपला भोपळा!
गोपीचंद पडळकर
Follow us on

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नगर पंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat Election) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी पाहायला मिळत आहे. 106 पैकी 97 नगर पंचायतीचे निकाल आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 27 नगर पंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व मिळवलंय. 22 नगर पंचायतींसह भाजप दुसऱ्या, 21 नगर पंचायतींसह काँग्रेस तिसऱ्या तर 17 नगर पंचायतींसह शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. अशावेळी काही धक्कादायक तर काही आश्चर्यकारक निकालही पाहायला मिळाले आहेत. एकीकडे सांगलीच्या कवठे महाकाळ नगर पंचायतीवर दिवंगत आर. आर. पाटील याचा मुलगा रोहित पाटीलने (Rohit Patil) एकहाती सत्ता मिळवली आहे. तर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या खानापूर नगर पंचायतीत भाजपचा भोपळाही फुटला नाही.

खानापूर नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना-काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्या आहेत. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आलाय. मात्र, भाजपला याठिकाणी एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना आघाडीचं नेतृत्व आमदार अनिल बाबर यांच्या खांद्यावर देण्यात आलं होतं. तर भाजपची जबाबदारी गोपीचंद पडळकर यांच्या खांद्यावर होती. मात्र, या निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्करावा लागल्याचं पाहायला मिळत आहे.

पडळकरांवर राष्ट्रवादीची टोलेबाजी

आमदार गोपीचंद पडळकर हे शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबातील नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका करताना पाहायला मिळतात. अनेकदा त्यांच्या टीकेनं वादही निर्माण होतो. आपल्या टीकेमुळं आणि पवारा कुटुंबावर चढवलेल्या हल्ल्यामुळे पडळकर नेहमीच चर्चेत असतात. अशावेळी खानापूर नगर पंचायतीत भाजपला भोपळाही फोडता न आल्यानं पडळकरांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार टोलेबाजी करण्यात येतेय.

रोहित पाटलांनी एकहाती विजय मिळवला

दुसरीकडे, अवघ्या 23 वर्षाच्या रोहित पाटील यांनी कवठे महाकाळ नगर पंचायत निवडणुकीत एकहाती विजय मिळवला आहे. या ठिकाणी रोहित पवार विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी असं चित्र होतं. मात्र रोहित पाटील यांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यश मिळवल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलला 10, तर शेतकरी विकास पॅनलला 6 तर अपक्ष 6 जागांवर विजयी झाले आहेत.

या निकालानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना आपल्या वडिलांचं एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करु शकलो आणि आज मी माझ्या वडिलांना खरंच मीस करतोय, असं म्हटलंय. आज मला निश्चितच आबांची आठवण येतेय, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, या विजयचा सगळ्यात जास्त आनंद आबांशिवाय दुसऱ्या कुणालाच झाला नसता, असं त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलंय.

इतर बातम्या :

Goa Assembly Election : उत्पल पर्रीकरांना भाजपकडून 2 मतदारसंघाची ऑफर, पण पर्रीकर पणजीवर ठाम! संभ्रम कायम

Nagar Panchayat Election Result : मुख्यमंत्री असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला, फडणवीसांचा शिवसेनेला जोरदार टोला