धारावी पुनर्वसन प्रकल्पातील 800 कोटींच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी

| Updated on: Mar 06, 2022 | 9:12 PM

धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठीच्या 45 एकर जमिनीसाठी फडणवीस सरकारने रेल्वेला 800 कोटी दिले. परंतु, आजपर्यंत ती जमीन राज्य सरकाला मिळालेली नाही आणि 800 कोटी रुपयेही परत मिळाले नाहीत, असं नाना पटोले म्हणाले.

धारावी पुनर्वसन प्रकल्पातील 800 कोटींच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी
नाना पटोलेंकडून नोकरभरतीचा सवाल उपस्थित
Image Credit source: Tv9
Follow us on

मुंबई : धारावी (Dharavi)  झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तत्कालीन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. पुनर्वसन प्रकल्पासाठीच्या 45 एकर जमिनीसाठी फडणवीस सरकारने रेल्वेला 800 कोटी दिले. परंतु, आजपर्यंत ती जमीन राज्य सरकाला मिळालेली नाही आणि 800 कोटी रुपयेही परत मिळाले नाहीत. ही जनतेच्या पैशाची लूट असून या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, धारावीतील लोकांना चांगली घरे मिळावीत, धारावीचा कायापालट व्हावा, मुंबई स्वच्छ व सुंदर व्हावी यासाठी विलासराव देशमुख यांचे सरकार असताना धारावीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुनर्वसन प्रकल्पाची योजना मांडली होती परंतु काहीकारणाने ती कार्यान्वित होऊ शकली नव्हती.

नाना पटोलेंची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

धारावी पुनर्वसन प्रकल्प योजना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने सुरु केली. याकामी फडणवीस सरकारने 800 कोटी रुपये रेल्वेला जमिनीसाठी दिले पण आजपर्यंत त्या योजनेचे काम पुढे गेले नाही. जमीनही मिळाली नाही आणि पैसेही परत आलेले नाहीत. ह्या पैशाचे काय झाले? योजना का फसली? जनतेचे पैसे रेल्वेला दान करण्याचा अधिकार फडणीवीस यांना कोणी दिला ? याची चौकशी एसआयटीचे गठन करून त्यामार्फत करावी, हवे तर ईडी व सीबीआय चौकशीसाठी शिफारस करावी अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. आम्ही हा प्रश्न अधिवेशनातही उपस्थित करणार आहोत.

रश्मी शुक्लांवर 500 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार..

पुणे पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे माझे फोन टॅपिंग केले. अमली पदार्थांच्या व्यापाराशी माझा संबंध लावून अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवून फोन टॅप करण्यात आले, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री व गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते, त्यांचा सहभाग यामध्ये असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. सध्या मुख्य आरोपी रश्मी शुक्ला आहेत असे समोर आले आहे. माझा फोन टॅपिंग झाल्याचा आरोप मी केला होता. विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर 500 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहे.

इतर बातम्या:

नारायण राणेंना BMC ची कारणे दाखवा नोटीस,अधिश बंगला प्रकरणी 7 दिवसांत खुलासा मागवला

Ranji Trophy ची सुरुवात शतकाने शेवट द्विशतकाने, यश धुलची बॅट तळपली तरिही दिल्ली स्पर्धेबाहेर