शिवसेना-काँग्रेसला धक्का, असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेप्रवेश

| Updated on: Feb 08, 2021 | 7:32 AM

मनसेचे शहर अध्यक्ष बालाजी एकलारे आणि जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. (Nanded Congress Shivsena workers joins MNS)

शिवसेना-काँग्रेसला धक्का, असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेप्रवेश
नांदेडमध्ये शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
Follow us on

नांदेड : नांदेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असंख्य युवकांनी प्रवेश केला. जुन्या नांदेडमधल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असलेल्या युवकांनी मनसेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेची ताकद आणखी वाढणार आहे. (Nanded Congress Shivsena workers joins MNS)

मनसेचे शहर अध्यक्ष बालाजी एकलारे आणि जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसे नांदेडमध्ये पक्ष बांधणी करत असल्याचे चित्र आहे.

नांदेडमध्ये पक्षवाढीसाठी प्रयत्न

नांदेड शहरातील प्रत्येक वार्डात मनसेचे कार्यकर्ते असावेत यासाठी नियोजन सुरु असल्याचे चित्र आहे. पक्षवाढीसाठी मनसेत युवकांना सामावून घेतले जात असल्याचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील युवासेनेचे उपनेते संग्राम माळी यांनी मनसेत प्रवेश केला होता. तत्पूर्वी शिवडी आणि वरळीतील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनीही मनसेचा झेंडा हाती धरला होता. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मनसेसाठी फायदेशीर मानली जात आहे.

ठाण्यातही मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढली

ऑक्टोबर महिन्यात शहापूर तालुक्यातही शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला.

तत्पूर्वी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. शिवसेना भाजपला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडल्याची चर्चा आहे. (Nanded Congress Shivsena workers joins MNS)

औरंगाबादेतील निष्ठावान शिवसैनिक मनसेत

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. तर फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता.

संबंधित बातम्या:

पुण्यातील युवासेनेचा उपनेता मनसेमध्ये, राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांचा मनसेप्रवेश

मेधा कुलकर्णी मनसेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

(Nanded Congress Shivsena workers joins MNS)