AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेत जोरदार इनकमिंग; नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा कृष्णकुंजवर होणार पक्षप्रवेश

लॉकडाऊननंतरच्या काळात सामान्य नागरिक, कामगार संघटना आणि व्यापाऱ्यांच्या अनेक शिष्टमंडळांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. | MNS Raj Thackeray

मनसेत जोरदार इनकमिंग; नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा कृष्णकुंजवर होणार पक्षप्रवेश
| Updated on: Nov 09, 2020 | 7:44 AM
Share

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) जोरदार इनकमिंग सुरु असल्याचे दिसत आहे. आज नवी मुंबईतील काहीजण मनसेत प्रवेश करण्यासाठी कृष्णकुंज येथे येणार आहेत. यामध्ये विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्वजण राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेत प्रवेश करतील. (Navi Mumbai youth will join MNS)

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील युवासेनेचे उपनेते संग्राम माळी यांनी मनसेत प्रवेश केला होता. तत्पूर्वी शिवडी आणि वरळीतील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनीही मनसेचा झेंडा हाती धरला होता. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मनसेसाठी फायदेशीर मानली जात आहे.

लॉकडाऊननंतरच्या काळात सामान्य नागरिक, कामगार संघटना आणि व्यापाऱ्यांच्या अनेक शिष्टमंडळांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर यापैकी अनेकांच्या समस्या सुटल्याही होत्या. त्यामुळे अलीकडच्या काळात मनसेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी बेस्टच्या हंगामी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यात आले होते. हे कर्मचारी सोमवारी राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर येणार आहेत.

ठाण्यातही मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढली

ऑक्टोबर महिन्यात शहापूर तालुक्यातही शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला.

तत्पूर्वी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. शिवसेना भाजपला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडल्याची चर्चा आहे.

औरंगाबादेतील निष्ठावान शिवसैनिक मनसेत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. तर फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता.

संबंधित बातम्या:

पुण्यातील युवासेनेचा उपनेता मनसेमध्ये, राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांचा मनसेप्रवेश

मेधा कुलकर्णी मनसेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

(Navi Mumbai youth will join MNS)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.