जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेना-भाजपचं ‘बॅनरवॉर’, कणकवलीत शिवसेनेचा बॅनरद्वारे इशारा!

| Updated on: Aug 26, 2021 | 11:51 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपकडून नारायण राणेंचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे कणकवलीत शिवसेनेची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकप्रकारे इशारा देत असल्याच्या आशयाचे बॅनर कणकवलीमध्ये लावण्यात आले आहेत. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीतील कार्यालयाबाहेरही बॅनर लावण्यात आले आहेत.

जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेना-भाजपचं बॅनरवॉर, कणकवलीत शिवसेनेचा बॅनरद्वारे इशारा!
उद्धव ठाकरे बॅनर आणि नारायण राणे
Follow us on

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला उद्यापासून पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. दोन दिवस खंड पडल्यानंतर आता सिंधुदुर्गातून ही यात्रा सुरु होत आहे. दरम्यान, राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॅनरवॉर पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपकडून नारायण राणेंचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर दुसरीकडे कणकवलीत शिवसेनेची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकप्रकारे इशारा देत असल्याच्या आशयाचे बॅनर कणकवलीमध्ये लावण्यात आले आहेत. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीतील कार्यालयाबाहेरही बॅनर लावण्यात आले आहेत. (Banner war in ShivSena and BJP at Sindhudurg)

कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र नारायण राणे यांच्या स्वागताचे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी लावले आहेत. उद्या संध्याकाळात राणे यांचं सिंधुदुर्गात आगमन होत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचं बॅनर युद्ध पाहायला मिळत आहे. दरम्यान, वैभव नाईक यांनी लावलेल्या बॅनर्सची कणकवलीत चर्चा सुरु आहे. दरम्यान, यात्रेदरम्यान शिवसेनेविरोधात टीका केली तर शिवसैनिक या जनआशीर्वाद यात्रेला विरोध करतील, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

‘जन-आशीर्वाद यात्रेला विरोध कराल तर जशास तसं उत्तर’

शिवसेनेनं जर जन-आशीर्वाद यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार, असा इशारा कोकण जन-आशीर्वाद यात्रेचे प्रमुख आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिलाय. त्यामुळे भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेवरुन पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील वाद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नारायण राणे यांच्या अटकेसाठी आलेले पोलीस दरवाजा तोडण्याची धमकी देत होते. मोगलाई सुरु आहे. म्हणून मी यांची तुलना औरंगजेबाशी केली. संभाजी महाराजांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. राजन साळवी यांना इतिहासाचं ज्ञान नाही. पॅसिफिक महासागरातील बेटावरुन त्यांनी डॉक्टरेट ही पदवी आणली आहे. कुणीतरी त्यांना भडकवलं आहे. असं करा नाहीतर पुढच्यावेळी तुम्हाला तिकीट नाही. आणि त्याची लस इकडे लागवी म्हणून वैभव नाईकांना सांगितलं तुम्ही नाही बोललं तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही. हे दोघेही दु:खी आत्मे आहेत. अशा शब्दात प्रमोद जठार यांनी टीका केलीय.

‘दोन कटप्पांनी बाहुबलीचा गेम केला’

अनिल परब यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेल्या दोन कटप्पांनी बाहुबलीचा गेम केला. संजय राऊत आणि फडणवीस यांच्याकडे बघितलं तर नक्की गांजा कोण प्यायला आहे, हे लक्षात येतं. मराठा समाजाच्या आंदोलनावेळी मुका मोर्चा लिहिणाऱ्या संजय राऊत यांनी त्यावेळी गांजाची की अफूची गोळी घेतली होती? असा खोचक सवालही प्रमोद जठार यांनी विचारला आहे.

संबंधित बातम्या :

‘भाजप-सेनेच्या भांडणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन कोल्हे मजा बघत आहेत’, सदाभाऊंचा जोरदार टोला

“शिवसेना-भाजपमधील वाद राजकारणाचा भाग, ते घरात एकत्र बसून जेवणही करु शकतात”

Banner war in ShivSena and BJP at Sindhudurg