नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि जामीनावरुन झालेलं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. या मुद्द्यावरुन राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळतंय. मात्र, याबाबत बोलताना अंतराराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमधील तणाव हा राजकारणाचा भाग आहे. हे सगळं चालू राहतं. ते घरात एकत्र जेवणही करु शकतात, असं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलंय. तसंच देशातील विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरावा, देश हिताचा मुद्दा उचलेल त्या पक्षाचा आम्ही उदो उदो करु, असं तोडगिया यांनी म्हटलंय. (Praveen Togadiya’s comment on BJP-ShivSena dispute in Maharashtra)