हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? : गोपीचंद पडळकर

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सामनाच्या अग्रलेखावरुन शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केलीय. आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरत आहेत, असा सवाल गोपीचंद पडळकरांनी राऊतांना केलाय.

हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? : गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar Sanjay Raut


मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सामनाच्या अग्रलेखावरुन शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केलीय. आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरत आहेत, असा सवाल गोपीचंद पडळकरांनी राऊतांना केलाय. यावेळी त्यांनी पोलिसांना आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या दिल्याचा आरोप करत वरूण देसाईंवर कारवाई का नाही? असाही सवाल केला.

“पोलिसांना आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्या वरूण देसाईंवर कारवाई का नाही?”

गोपीचंद पडळकर म्हणाले, “आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असंतर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपितांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल. राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता, मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईवर कारवाई का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल?

“शिवसेनेचा हा निर्णय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार”

“बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दाने पितळ उघडं पाडलं. पण तुम्ही आज त्यांचाच उधोउधो करणे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही का? हिंदु समाजाला सडलेला म्हणणारा शर्जील उस्मानी उजळ माथ्यानं महाराष्ट्रात येऊन फिरतो आणि त्यावर कारवाई करण्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी तुमचे हात थरथर कापतात,” असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

“बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर”

“मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारयेचे की त्यावेळेस यांची आस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते. माननीय संजय राऊत कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याच्या विकृतीला बांध घाला. अन्यथा, ‘तुमच्या हम करे सो’ कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील,” अशी सडकून टीका गोपीचंद पडळकर यांची राऊतांवर केली.

हेही वाचा :

स्टंटबाजी कशाला करताय, आमचीही तीच भूमिका, पडळकरांच्या बैलगाडा शर्यतीनंतर अजित पवारांचं मोठं भाष्य

आधी गोपीचंद पडळकरांनी करुन दाखवलं, आता सरकार अ‌ॅक्शन मोडमध्ये, बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे गुन्हा दाखल

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे SP ना निर्देश, पडळकरांना दणका!

व्हिडीओ पाहा :

Gopichand Padalkar criticize Sanjay Raut over Samaana editorial

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI