बाप-बेटे घरी बसून, मंत्रालय ओसाड, पार्ट्यांना जातात, कॅबिनेटला नाही, नारायण राणेंचा निशाणा

| Updated on: Aug 09, 2020 | 8:34 PM

नारायण राणे यांच्या ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’मध्ये कोव्हिड चाचणी प्रयोगशाळेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली (Narayan Rane criticise CM Uddhav Thackeray and Aaditya Thackeray).

बाप-बेटे घरी बसून, मंत्रालय ओसाड, पार्ट्यांना जातात, कॅबिनेटला नाही, नारायण राणेंचा निशाणा
Follow us on

सिंधुदुर्ग : “देवेंद्रजी तुमच्या मनातलं लवकर साध्य होवो. मंत्रालय ओसाड आहे, घरी राहून काम सुरु आहे. बाप-बेटे घरी बसून आहेत. पार्ट्यांना जातात पण कॅबिनेटला नाही”, असा टोला भाजप खासदार नारायण राणे यांनी लगावला. त्यांच्या ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’मध्ये कोव्हिड चाचणी प्रयोगशाळेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली (Narayan Rane criticise CM Uddhav Thackeray and Aaditya Thackeray).

“देवेंद्र फडणवीस वयाने लहान असले तरी त्यांचं आणि माझं मैत्रीचं नातं आहे. मी सांगितलेलं कुठलंही काम त्यांनी केलं नाही असं होत नाही. ते नेहमीच सहकार्य करतात”, असं नारायण राणे यावेळी म्हणाले. “ही लॅब उभी राहावी म्हणून भाजपच्या पाच आमदारांनी प्रत्येकी 20 लाख रुपये दिले. पाचही जणांचे मी ऋण व्यक्त करतो. दीड तासात 96 टेस्ट ही नाविन्यपूर्ण गोष्ट आहे आणि ती कोकणात होत आहे”, असंदेखील नारायण राणे म्हणाले (Narayan Rane criticise CM Uddhav Thackeray and Aaditya Thackeray).

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

कोरोनाशी न लढता संख्येशी लढल्याने बिकट परिस्थिती : फडणवीस

या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारच्या कार्यप्रणालीवर टीका केली. “महाराष्ट्रात आपण कोरोनाशी न लढता संख्येशी लढत होतो. त्यामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली”, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

“ही प्रयोगशाळा बघून मला समाधान वाटलं. महाराष्ट्रातील आधुनिक लॅबपैकी ही एक लॅब आहे. इथे दीड तासात 96 टेस्ट होतात. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 30 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. देशातील एकूण मृत्यूंपैकी 42 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संबंधित बातमी :

स्वागत झालं नाही तरी चालेल, पण फिजीकल डिस्टन्सिंग पाळा, फडणवीसांनी उत्साही कार्यकर्त्यांचे कान टोचले