स्वागत झालं नाही तरी चालेल, पण फिजीकल डिस्टन्सिंग पाळा, फडणवीसांनी उत्साही कार्यकर्त्यांचे कान टोचले

सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा असलेल्या बांद्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं.

स्वागत झालं नाही तरी चालेल, पण फिजीकल डिस्टन्सिंग पाळा, फडणवीसांनी उत्साही कार्यकर्त्यांचे कान टोचले

सिंधुदुर्ग : भाजप खासदार नारायण राणे यांच्या ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’मध्ये कोव्हिड चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी “एक वेळ स्वागत केलं नाही तरी चालेल, पण फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करा” अशा शब्दात फडणवीसांनी उत्साही कार्यकर्त्यांचे कान टोचले. (Devendra Fadnavis reminds BJP volunteers to follow physical distancing in Sindhudurg)

सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा असलेल्या बांद्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार नितेश राणे, प्रमोद जठार, राजन तेलीही उपस्थित होते.

स्वागत स्वीकारल्यानंतर फडणवीसांनी उत्साही कार्यकर्त्यांना शाब्दिक चिमटे काढले. “विनंती आहे, आपण फार चांगलं स्वागत केलंत, त्याबद्दल आभार. आपण फिजिकल डिस्टन्सिंग पळत नाही, याचे भान ठेवा. स्वागत झालं नाही, तरी चालेल पण फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळायला हवेत. आपल्या पंतप्रधानांनी जो आदेश दिला आहे, त्याचे तंतोतंत पालन झाले पाहिजे” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवारांनीही सुनावलं होतं

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मनसे नगरसेवक सचिन चिखले यांना सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने दोनच दिवसांपूर्वी सुनावलं होतं. अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये जम्बो कोव्हिड सेंटरची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी मनसे नगरसेवक सचिन चिखले हे काही मुद्दे घेऊन अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ते जवळ जाऊन संवाद साधत असताना, सोशल डिस्टन्सिंग पाळत न पाळल्याने अजित पवार भडकले.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“मग लांबून बोल ना, फिजिकल डिस्टन्सिंगचं बाकीचे बघतायत, त्यांचं काय बाकीचं नाही, तुझं सांग पटकन”, असं म्हणत अजित पवारांनी नगरसेवकाला चांगलंच झापलं. याशिवाय फिजिकल डिस्टन्स ठेव की आमचे चार ते पाच मंत्री बाधित झालेत, असंही अजित पवारांनी सुनावलं.

पहा व्हिडीओ :

(Devendra Fadnavis reminds BJP volunteers to follow physical distancing in Sindhudurg)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *