Nasik NMC Election 2022 : नाशिक महापालिकेच्या प्रभाग 12मध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये टक्कर; महाविकास आघाडीमुळे गणित बदलणार?

2017च्या निवडणुकीत या प्रभागात दोन ठिकाणी भाजपा आणि दोन ठिकाणी काँग्रेसला यश मिळाले होते. अल्पसंख्याकांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणी काँग्रेसने बाजी मारलेली आहे.

Nasik NMC Election 2022 : नाशिक महापालिकेच्या प्रभाग 12मध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये टक्कर; महाविकास आघाडीमुळे गणित बदलणार?
नाशिक महानगरपालिका, वॉर्ड 12
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 17, 2022 | 12:13 AM

नाशिक : राज्यात नवे सरकार अस्तित्वात आले. आता महानगर पालिकांमधील सत्तांतराची उत्सुकता आहे. महानगर पालिकांच्या निवडणुकांची (Municipal election) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय पक्ष एकीकडे लोकांशी संपर्क वाढवत आहेत. तर प्रशासनाची तयारीही जोरात सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अडीच वर्ष सत्तेत होती. यापुढील निवडणुका एकत्र लढण्याचा विचार आघाडीतील नेते व्यक्त करीत आहेत. तर स्थानिक पातळीवर त्याचा परिणाम दिसून येणार आहे. नाशिक महापालिका (Nasik NMC Election 2022) वॉर्ड क्रमांक 12मध्ये मागील वेळी म्हणजेच 2017मध्ये चार सदस्यीय पॅनल होते. यात भाजपा आणि काँग्रेसने यश मिळवले होते. आता यावेळी तीन सदस्यांचे प्रभाग पॅनेल असणार आहे. त्यात राखीव म्हणजेच आरक्षणदेखील असणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

प्रभागाची व्याप्ती कशी?

प्रभाग 12 शिवाजीनगर यामध्ये शिवाजीनगर, ध्रुवनगर, धर्माजी कॉलनी, मोतीवाला कॉलेज, वसंतराव कानेटकर उद्यान, केदारनगर, हनुमान नगर हे महत्त्वाचे परिसर येतात.

लोकसंख्येचे गणित

शिवाजीनगर या प्रभाग 12मधील एकूण लोकसंख्या 35 हजार 042 इतकी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 5117 इतकी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3338 इतकी आहे. 2021ला जनगणना झालेली नाही. त्यामुळे आधीच्या लोकसंख्येत काही टक्के अतिरिक्त गृहीत धरण्यात आली आहे.

कोण मारणार बाजी?

2017च्या निवडणुकीत या प्रभागात दोन ठिकाणी भाजपा आणि दोन ठिकाणी काँग्रेसला यश मिळाले होते. अल्पसंख्याकांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणी काँग्रेसने बाजी मारलेली आहे. वॉर्ड अ आणि ड मध्ये भाजपाला यश मिळाले आहे. तर ब आणि क मध्ये काँग्रेस उमेदवाराने विजय संपादन केला आहे.

विजयी उमेदवार (2017)

  1. 12 (A) – घाटे प्रियंका किशोर
  2. 12 (B) – कांबळे समीर उत्तमराव
  3. 12 (C) – पाटील हेमलता निनाद
  4. 12 (D) – गांगुर्डे शिवाजी त्र्यंबक
वॉर्डविजयी उमेदवारपक्ष
12 (A)घाटे प्रियंका किशोरभाजपा
12 (B)कांबळे समीर उत्तमरावकाँग्रेस
12 (C)पाटील हेमलता निनादकाँग्रेस
12 (D)गांगुर्डे शिवाजी त्र्यंबकभाजपा

आरक्षण कसे?

यावेळी तीन सदस्यीय प्रभाग आहे. त्यानुसार 12 अ हा अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. ब हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर क मध्ये सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील उमेदवार निवडणूक लढवू शकणार आहे.