National Herald Case : सोनिया गांधी ईडी कार्यालयात पोहोचल्या, प्रियंका, राहुल गांधीही सोबत, देशभरात काँग्रेसचा ‘मोदी हाय, मोदी हाय’

National Herald Case : महाराष्ट्रातच नव्हे तर सोनिया गांधी यांच्या समर्थनासाठी दिल्ली, पटना आणि लखनऊमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील कार्यकर्त्यांनी तर ईडीच्या विरोधात मार्च काढला आहे. नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला.

National Herald Case : सोनिया गांधी ईडी कार्यालयात पोहोचल्या, प्रियंका, राहुल गांधीही सोबत, देशभरात काँग्रेसचा मोदी हाय, मोदी हाय
सोनिया गांधी ईडी कार्यालयात पोहोचल्या, प्रियंका, राहुल गांधीही सोबत, देशभरात काँग्रेसचा 'मोदी हाय, मोदी हाय'
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2022 | 1:09 PM

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड (National Herald Case) प्रकरणी चौकशीसाठी ईडीने (ED) समन्स बजावल्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी ईडी कार्यालयात पोहोचल्या आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी होत्या. सोनिया गांधी ईडी कार्यालयात गेल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. सोनिया गांधी यांच्या घशाला त्रास होत असल्याने त्या ईडीच्या प्रश्नांना लेखी उत्तरे देणार आहेत. राहुल गांधी यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यांची सलग तीन दिवस पाच पाच तास चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे सोनिया गांधी (sonia gandhi) यांची किती तास चौकशी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे, सोनिय गांधी या ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असल्याने त्याचा निषेध म्हणून काँग्रेसची देशभर जोरदार आंदोलने सुरू आहे. मोदी हाय, मोदी हायच्या घोषणा यावेळी दिल्या जात आहेत.

सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस आल्यानंतर गेल्या आठवड्यातच काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना देशभर आंदोलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्रासह देशभर आज जोरदार आंदोलन केलं. राज्यभरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप, सोलापुरात प्रणिती शिंदे, साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाण, अमरावतीत यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे. नागपूर, ठाणे, भिवंडीसह राज्यातील अनेक भागात हे आंदोलन सुरू आहे. मोदी सरकार हाय हायच्या घोषणा यावेळी दिल्या.

देशभर आंदोलन

महाराष्ट्रातच नव्हे तर सोनिया गांधी यांच्या समर्थनासाठी दिल्ली, पटना आणि लखनऊमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील कार्यकर्त्यांनी तर ईडीच्या विरोधात मार्च काढला आहे. नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी तात्काळ या जमावाला पांगवलं. देशभर होत असलेल्या या आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे.

एवढी आदळआपट कशासाठी?

दरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. जर लपण्यासारखं काही नसेल तर काँग्रेसला काहीच लपवण्याची गरज नाही. ही तडफड कशासाठी आहे? एवढी धावपळ कशासाठी आहे? दाल में कुछ काला तर नाही ना की पूर्ण डाळच काळी आहे, असा सवाल ठाकूर यांनी केला आहे.

अपडेट्स

  1. सोनिया गांधी या ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या आहेत. त्यांच्यासोबत डॉक्टर असल्याचं सांगितलं जात आहे.
  2. सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल गांधीही ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते. थोडावेळ थांबून ते नंतर परत परतले.
  3. ईडीने सोनिया गांधी यांची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या चौकशीची व्हिडीओ रेकॉर्डिंग केली जात आहे. ईडीच्या टीमने त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली.
  4. सोनिया गांधी यांच्या घशात दुखत असल्याने त्या लिखित उत्तर देणार आहेत.
  5. ईडीच्या अधिकारी मोनिका शर्मा यांची टीम त्यांची चौकशी करणार आहेत.