पालिका निवडणुकीत भाजपा… नवनीत राणांनी केली मोठी घोषणा; म्हणाल्या…

सध्या राज्याला महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडुकीचे वेध लागले आहे. आगामी काही दिवसांत या निवडणुकीची घोषणा होणार आहे.

पालिका निवडणुकीत भाजपा... नवनीत राणांनी केली मोठी घोषणा; म्हणाल्या...
navneet rana
| Updated on: May 17, 2025 | 5:01 PM

अमरावती : सध्या राज्याला महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडुकीचे वेध लागले आहे. आगामी काही दिवसांत या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळेच राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्या-त्या भागातील वजनदार नेते विजयाचं गणित आखण्यात व्यग्र झाले आहेत. असे असतानाच आता अमरावती येथून एक मोठी माहिती मिळत आहे. येथे भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी मोठी घोषणा केली असून या घोषणेचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

कोणत्याच पक्षासोबत युती करणार नाही- नवनीत राणा

नवनीत राणा यांनी अमरावती महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठी भूमिका घेतली आहे. त्यांनी या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिलाय. अमरावती महानगरपालिका भाजप एकट्याने लढवणार आहे. कोणत्याच पक्षासोबत युती करणार नाही, असं नवनीत राणा यांनी थेट स्पष्ट केलंय. ही घोषणा करून त्यांनी एका प्रकारे या निवडणुकीसाठी रणशिंगच फुंकले आहे.
अमरावती जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर फक्त भगवा आणि भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे, असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय.

मी अपक्ष खासदार असतानादेखील…

अमरावती महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा दिसणार कोणासोबत युती करणार नाही. फार घाबरायचं नाही. भाजपा हा पक्ष घाबरणारा नाही. मी अपक्ष खासदार असतानादेखील पाच वर्ष प्रत्येक दिवस भाजपासाठी काम करत होते. मी हवेमध्ये बोलणारी व्यक्ती नाही. मी जमिनीवर जावून लोकांची सेवा करणारी, काम करणारी व्यक्ती आहे, असंही नवनीत राणा यांनी म्हटलंय.

पावसाळा संपण्याच्या आधीच…

2024 सालाच्या निवडणुकीमध्ये निवडून येईल याचा मला पूर्ण आत्मविश्वास होता. विधानसभा निवडणुकीमध्ये काही लोकांनी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. पण ते जमलं नाही. पावसाळा संपेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. त्यासाठी तयारीला लागा. पावसाळा संपण्याच्या आधीच महानगरपालिकेच्या निवडणुका संपणार आहेत. अमरावती महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा दिसणार आहे, असंही राणा यांनी ठणकावून सांगितलंय. तसेच अभी तो ये झाकी है. कई लोगों के लिए पिक्चर बाकी है, असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिलाय.

दरम्यान, राणा यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर महायुतीचे इतर घटकपक्ष नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.