navneet rana on privilege motion: नवनीत राणांचा संसदेत हक्कभंग, मुंबई, अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

navneet rana on privilege motion: नवनीत राणांचा संसदेत हक्कभंग, मुंबई, अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश
नवनीत राणांचा संसदेत हक्कभंग, मुंबई, अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश
Image Credit source: tv9 marathi

आपल्या विरोधात पोलीस अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुंबई आणि अमरावतीच्या पोलिसांसह सहा जणांविरोधात संसदेत हक्कभंग दाखल केला होता.

संदीप राजगोळकर

| Edited By: भीमराव गवळी

Mar 30, 2022 | 3:05 PM

नवी दिल्ली: आपल्या विरोधात पोलीस अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी मुंबई आणि अमरावतीच्या पोलिसांसह सहा जणांविरोधात संसदेत हक्कभंग दाखल केला होता. संसदेने हा हक्कभंग (privilege motion) दाखल करून घेतला असून मुंबई, अमरावतीच्या पोलीस आयुक्तांसह या सहाही जणांना संसदेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या सहाही पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत हजर राहून आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना खूष करण्यासाठीच आमच्यावर कारवाई करण्यात आली. पोलीस अधिकारी आरती सिंग यांच्याविरोधात तर मी ईडी आणि सीबीआयकडेही धाव घेणार आहे. आरती सिंग यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, असं नवनीत राणा यांनी म्हटलं असून सिंग या निलंबित होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबईचे डीजी, अमरावतीचे पोलीस आयुक्त, डीसीपी या चौघांना संसदेने बोलावलं आहे. मी त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला होता. माझ्याविरोधात गैरव्यवहार झाला होता. त्याबद्दल मी आवाज उठवला होता. हक्कभंग झाला तेव्हा अनेक खासदारांनी मला पाठिंबा दिला. त्यामुळे हक्कभंग दाखल करून घेण्यात आला. केवळ मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी आमच्यावर अन्याय करण्यात आला. निर्दोष लोकांवर कारवाई करण्यात आली, असं नवनीत राणा म्हणाल्या.

कुणावरही अन्याय होऊ नये

आज माझ्यावर अन्याय झाला. उद्या आणखी कुणावर होईल. इतर कुणावरही असा अन्याय होऊ नये म्हणून हक्कभंग दाखल केला आहे. आरती सिंग त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यांना सस्पेंड करेपर्यंत मी शांत बसणार नाही. सीबीआय आणि ईडीमध्ये जाणार आहे. या मॅडम ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंगवर होत्या तिथल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. मी घोटाळ्याची माहिती काढली आहे. महाराष्ट्रात येणं आणि लोकप्रतिनिधीसोबत असा व्यवहरा करणं हे खपवून घेतलं जात नाही हे दाखवण्यासाठी मी लढत आहे, असं त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी गुन्हे

यावेळी रवी राणा यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. सीपी आरती सिंग यांनी 307, 353 सारखे खोटे गुन्हे माझ्याविरोधात दाखल केले. मी दिल्लीत असताना गुन्हा दाखल केला. वरून दबाव असल्याचं कारण दिलं. अनेक लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या कुटुंबाची बदनामी केली. मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी बंदनामी केली, असं रवी राणा यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Maharashtra News Live Update : पाच वर्ष गिरीश बापट झोपले होते का ? मोहन जोशींचा सवाल

Sanjay Pande On Drugfree Mumbai : मुंबईला ड्रग्जमुक्त कसं करणार? पोलीस आयुक्त पांडेंनी फॉर्म्युला सांगितला

attacked on kejriwal house: अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें