नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच नवाब मलिक आक्रमक, आरोपांची मालिका कायम राहणार?

| Updated on: Jan 02, 2022 | 12:09 AM

मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणानंतर मलिक यांनी एनसीबी अधिकाऱ्यांवर आणि भाजप नेत्यांवर गंभीर आरोपांची मालिका लावली. त्यानंतर आता नव वर्षातही आरोपांची ही मालिका सुरुच राहणार असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीतील गैरप्रकार उघड करणार असल्याचा इशारा मलिकांनी दिलाय.

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच नवाब मलिक आक्रमक, आरोपांची मालिका कायम राहणार?
नवाब मलिक
Follow us on

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेकजण संकल्प करतात आणि वर्षभरत तो संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही एक राजकीय आणि विरोधकांना थेट आव्हान देणाचा संकल्प केलाय. मुंबई ड्रग्स (Mumbai Drugs Case) आणि आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणानंतर मलिक यांनी एनसीबी अधिकाऱ्यांवर आणि भाजप नेत्यांवर गंभीर आरोपांची मालिका लावली. त्यानंतर आता नव वर्षातही आरोपांची ही मालिका सुरुच राहणार असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीतील गैरप्रकार उघड करणार असल्याचा इशारा मलिकांनी दिलाय.

‘मी उद्या रविवारी, 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे आणि एनसीबीमधील अजून काही गैरप्रकार उघड करणार आहे’, असं ट्वीट करत मलिक यांनी पत्रकार परिषद ज्या ठिकाणी होणार आहे तिथला पत्ताही दिलाय.

दरम्यान, मलिक यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 31 डिसेंबर रोजी एक ट्वीट करत फर्जीवाडा विरोधात आपली लढाई कायम राहणार असल्याचं सांगत जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

मलिकांच्या याच ट्वीटवरुन भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनीही मलिकांना थेट आव्हान दिलं आहे. भ्रष्टाचारी मियाँ से लड़ाई 2022 में चालू रहेगी , रोज़ नंगा करेगे इसके कारनामो को, 2022 में जेल भेजेंगे भंगार वाले क़ो ! असं ट्वीट कंबोज यांनी केलंय.

इतर बातम्या :

बचतीला विम्याचं कवच: स्टेट बँकेत खाते उघडा, दोन लाखांचा विमा मिळवा!

शिवसेनेचं ‘हरवला आहे’, तर नितेश राणेंचं ‘गाडलाच’! तर नारायण राणेंच्या टीकेला मलिक आणि देसाईंचं जोरदार प्रत्युत्तर