नक्षलवाद्यांकडून मतदानावर बहिष्काराचे बॅनर, नागरिकांकडून सडेतोड उत्तर

महाराष्ट्रात सोमवारी (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) मतदान होत आहे. त्याआधीच नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मतदानावर बहिष्कार घालण्यास सांगणारे बॅनर (Naxalite Banner for Boycott Election) लावले आहेत.

नक्षलवाद्यांकडून मतदानावर बहिष्काराचे बॅनर, नागरिकांकडून सडेतोड उत्तर
| Updated on: Oct 20, 2019 | 11:58 AM

गडचिरोली: महाराष्ट्रात सोमवारी (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) मतदान होत आहे. त्याआधीच नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मतदानावर बहिष्कार घालण्यास सांगणारे बॅनर (Naxalite Banner for Boycott Election) लावले आहेत. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांच्या या कृतीला स्थानिकांनी जोरदार उत्तर देत बहिष्काराच्या बॅनरची होळी केली आहे. यात 200 नागरिकांनी सहभाग घेतला.

नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यातील भुसेवाडा, कुकामेटा, आलदंडी या 3 गावातही मोठया प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. बॅनरमध्ये “मतदानावर बहिष्कार करा, देश आजही गुलाम आहे” असं घोषवाक्य लिहिलं आहे.

नक्षलवाद्यांकडून नेहमीच मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचं आवाहन करण्यात येतं. अनेकदा या काळात बंदही पुकारला जातो. मात्र, यावेळी स्थानिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेने नक्षलवादी चळवळीला योग्य संदेश गेल्याची चर्चा आहे.