राष्ट्रवादीत उलाथापालथ होणार, तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची पवारांची भूमिका

| Updated on: May 31, 2019 | 2:05 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पक्षांतर्गत मोठी उलथापालथ करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत तरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत मोठी फेररचना होण्याची शक्यता बळावली आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याआधी पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी […]

राष्ट्रवादीत उलाथापालथ होणार, तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची पवारांची भूमिका
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पक्षांतर्गत मोठी उलथापालथ करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत तरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत मोठी फेररचना होण्याची शक्यता बळावली आहे.

विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याआधी पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी पवार पावलं उचलणार आहेत. त्यासाठी पहिलं पाऊल म्हणून विधानसभेत जास्तीत जास्त तरुणांना तिकीट देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी केली असली, तरी 48 जागांचा विचार करता राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं. राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत केवळ 4 जागा मिळाल्या. त्यामध्ये रायगड, बारामती, सातारा, शिरुर या चारच जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. राष्ट्रवादीने लढवलेल्या जागांच्या तुलनेत जिंकलेल्या जागा निम्याहून कमी आहेत. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादीला प्रचंड मोर्चेबांधणी करावी लागेल, हे निश्चित आहे.

दरम्यान, आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पक्षांतर्गत काय बदल करतात आणि पक्षातील तरुणांना किती प्रमाणात संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार? राष्ट्रवादीचे तीन विद्यमान खासदार म्हणतात…

20 वर्षांपूर्वी पवारांनी काँग्रेस का सोडली होती?

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास काय होईल?