काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार? राष्ट्रवादीचे तीन विद्यमान खासदार म्हणतात...

मुंबई : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यानंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची काल दिल्लीत बैठक झाली. यादरम्यान काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होण्याच्या चर्चेला उधाण आलं. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या वृत्ताचं खंडण …

काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार? राष्ट्रवादीचे तीन विद्यमान खासदार म्हणतात...

मुंबई : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यानंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची काल दिल्लीत बैठक झाली. यादरम्यान काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होण्याच्या चर्चेला उधाण आलं. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या वृत्ताचं खंडण केलं.

राष्ट्रवादीचे लोकसभेत निवडून गेलेल्या खासदारांपैकी तीन खासदारांचे याबाबत काय म्हणणं आहे, हे ‘टीव्ही 9 मराठी’ने जाणून घेतलं.

उदयनराजे भोसले, खासदार, सातारा :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरणासंदर्भात माझ्याशी चर्चा झाली नाही, राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे म्हणाले. तसेच, कुणाशी बोलून विलिनीकरण करता? असा सवालही उदयनराजेंनी विचारला.

सुप्रिया सुळे, खासदार, बारामती :

“राहुल गांधी हे शरद पवारांना भेटायला आले होते, शरद पवार नव्हते गेले. पक्ष विलिनीकरणाची बातमी गॉसिप आहे. मीही तुमच्याकडूनच एकतेय.” अशी प्रतिक्रिया बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

सुनील तटकरे, खासदार, रायगड :

“मला वाटत नाही विलीनीकरणाची चर्चा झाली असेल. काल साहेबांनी (शरद पवार) स्पष्टीकरण दिलं आहे. जर-तरची बाब आहे. अशी कोणतीच चर्चा आता दिसत नाही. आता आमच्यापुढे आव्हान आहे विधान सभा निवडणूक आणि त्या दृष्टिकोनातून बांधणी करावी लागेल.” असे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे म्हणाले.

संंबंधित बातम्या :

20 वर्षांपूर्वी पवारांनी काँग्रेस का सोडली होती?

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास काय होईल?

बातमीचा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *