काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार : सूत्र

Congress NCP merge नवी दिल्ली : देशाच्या राजकारणत सर्वात मोठी घडामोड समोर येत आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीतून ही माहिती समोर येत आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसमध्ये …

काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार : सूत्र

Congress NCP merge नवी दिल्ली : देशाच्या राजकारणत सर्वात मोठी घडामोड समोर येत आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीतून ही माहिती समोर येत आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन करण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरु आहे. पवार-राहुल यांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेते कसे मिळवता येईल याचीही चाचपणी सध्या सुरु आहे.

भेटीनंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया

राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भात विश्लेषणात्मक चर्चा झाली.  त्याशिवाय राज्यातील दुष्काळाच्यासंदर्भात राहुल गांधीसोबत सविस्तर चर्चा झाली. तसंच सध्यातरी काँग्रेस अध्यक्षांचा दुसरा पर्याय मला दिसत नाही त्यामुळे राहुल गांधी यांनी राजीनामा देणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या भेटीनंतर दिली आहे.

मूळ काँग्रेसमधून फुटून निर्माण झालेल्या सर्व पक्षांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. पक्ष मजबूत करणं हा त्यामागचा तर्क आहे. पक्षात सामूदायिक नेतृत्व निर्माण करणे, जो साधारण 40 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या धोरणाचा भाग होता, ती कार्यपद्धत पुन्हा अवलंबण्यात येईल. NCP काँग्रेसमध्ये विलीन केल्यास लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येऊ शकते.

आज सकाळी काँग्रेस प्रवक्ते रणजीत सुरजेवाला यांनी कुणी प्रवक्त्यांनी पुढचा महिनाभर न्यूज चॅनेल डिबेट मध्ये भाग घेऊ नये हे केलेले ट्विट या प्रयत्नांचा भाग आहे. काँग्रेसला या मोहिमेला यशस्वी करायचे आहे, अशी माहिती मिळत आहे.

काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी 25 मे 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली. शरद पवार हेच या नव्या पक्षाचे पहिल्यापासूनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. शरद पवार हेच या पक्षाचे पहिल्या दिवसापासून सर्वेसर्वा राहिले आहेत.

मनगटावरील घड्याळ आणि त्यात 10 वाजून 10 मिनिटे झालेला वेळ, सोबत दोन स्टँड आणि अलार्म बटण, असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिल्यापासून निवडणूक चिन्ह आहे. शिवाय पक्षाच्या झेंड्यावर हिरवा, केसरी आणि पांढरा असा तीन रंगाचा झेंडा आणि मधोमध पक्षाचा चिन्ह आहे. मात्र सध्याच्या लोकसभा निवडणुकीत दोन्हीही पक्षांना यश मिळालं नाही. त्यामुळे आगामी वाटचालीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी विलिनीकरणाचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत 5 लोकसभा निवडणुका लढल्या आहेत. त्यात आतापर्यंत किती खासदार निवडून आले आहेत :

1999 – 8
2004 – 9
2009 – 9
2014 – 6
2019 – 5

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थापनेपासून महाराष्ट्रात आतापर्यंत 4 विधानसभा निवडणुका लढल्या आहेत. त्यात किती जागा मिळाल्या :

1999 – 58
2004 – 71
2009 – 62
2014 – 42

लोकसभा निवडणुकीचा निकाल

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळाला. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. यामध्ये त्यात वाढ झाली असली, तरी स्वत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाच अमेठीत पराभव झाला. राहुल गांधी दोन जागेवर उभे होते, त्यापैकी केरळमधील वायनाड इथे त्यांचा मोठा विजय झाला.

लोकसभा निकालात महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 41 जागी यश मिळवलं. यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागी विजय मिळवला. काँग्रेसला अवघी 1 तर राष्ट्रवादीला नवनीत राणांसह 5 जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीकडून लढणाऱ्या एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी औरंगाबादची जागा काबीज केली.

विधानसभा (2014) निकाल 

  • भाजप : 128
  • शिवसेना : 66
  • काँग्रेस : 42
  • राष्ट्रवादी : 41
  • इतर : 11
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *