वाद मिटला, शरद पवारांनी नगरची जागा सुजय विखेंसाठी सोडली!

पंढरपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातला सर्वात मोठा तिढा जवळपास मिटलाय. कारण, ज्या अहमदनगरच्या जागेसाठी आतापर्यंत चर्चा सुरु होती, ती जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूजमध्ये बोलताना याबाबत घोषणा केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे या जागेसाठी उत्सुक आहेत. ही जागा आमच्यासाठी सोडावी, अशी मागणी […]

वाद मिटला, शरद पवारांनी नगरची जागा सुजय विखेंसाठी सोडली!
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:22 PM

पंढरपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातला सर्वात मोठा तिढा जवळपास मिटलाय. कारण, ज्या अहमदनगरच्या जागेसाठी आतापर्यंत चर्चा सुरु होती, ती जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूजमध्ये बोलताना याबाबत घोषणा केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे या जागेसाठी उत्सुक आहेत. ही जागा आमच्यासाठी सोडावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात होती. कारण, आघाडीत ही जागा राष्ट्रवादीची आहे.

वाचा – पवार कुटुंबातून फक्त मी निवडणूक लढवणार : शरद पवार

अहमदनगरच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडूनही अगोदर ताठर भूमिका घेण्यात आली होती. पण विखे पाटलांची नाराजी यामुळे वाढल्याचं दिसून येत होतं. अखेर पवारांनीच पुढाकार घेत हा तिढा सोडवलाय. याअगोदर शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि सुजय विखे यांचीही चर्चा झाली होती. तर पवारांनी सुजयला नातू समजून जागा सोडावी, असं आवाहन विखे पाटलांनी केलं होतं. त्यामुळे आघाडीतला सर्वात मोठा तिढा सुटलाय, असं म्हणायला हरकत नाही.

रोहित पवार आणि सुजय विखेंची भेट

शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील राजकीय वैर महाराष्ट्राला परिचित होतं. मात्र, पवार आणि विखे पाटील यांच्या नातवांनी मात्र वैर संपवत, एकमेकांच्या खांद्यावर हात टाकला. त्यामुळे नगर दक्षिणचं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी प्रवरानगर येथे विखे पाटील सहकारी कारखान्यास भेट दिली. रोहित पवार आणि सुजय विखे पाटील एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढल्या पिढीचे नेते हे दोघेही असले, तरी पवार-विखे वादाची किनारही त्यांना आहे.

वाचा – पवार-विखेंचं वैर रोहित आणि सुजय मोडीत काढणार?

सुजय विखे पाटील हे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत. तर रोहित पवार हे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुतणे आहेत. सुजय विखे पाटील आणि रोहित पवार या दोन्ही युवा नेत्यांना शेतीची चांगली जाण आहे. दोघांच्याही घरात कृषीविषयक जाणकार नेते असल्याने, लहानपणापासूनच कृषिसंस्कार झाले आहेत.

व्हिडीओ पाहा :


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें