पवार-विखेंचं वैर रोहित आणि सुजय मोडीत काढणार?

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील राजकीय वैर महाराष्ट्राला परिचित होते. मात्र, पवार आणि विखे पाटील यांच्या नातवांनी मात्र वैर संपवत, एकमेकांच्या खांद्यावर हात टाकला आहे. त्यामुळे नगर दक्षिणचं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. एकीकडे अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सुजय विखे पाटील यांच्यासाठी सोडणार का, याबाबत […]

पवार-विखेंचं वैर रोहित आणि सुजय मोडीत काढणार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्यातील राजकीय वैर महाराष्ट्राला परिचित होते. मात्र, पवार आणि विखे पाटील यांच्या नातवांनी मात्र वैर संपवत, एकमेकांच्या खांद्यावर हात टाकला आहे. त्यामुळे नगर दक्षिणचं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

एकीकडे अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सुजय विखे पाटील यांच्यासाठी सोडणार का, याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह असताना, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी प्रवरानगर येथे विखे पाटील सहकारी कारखान्यास भेट दिली. रोहित पवार आणि सुजय विखे पाटील एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढल्या पिढीचे नेते हे दोघेही असले, तरी पवार-विखे वादाची किनारही त्यांना आहे.

सुजय विखे पाटील हे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत. तर रोहित पवार हे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुतणे आहेत. सुजय विखे पाटील आणि रोहित पवार या दोन्ही युवा नेत्यांना शेतीची चांगली जाण आहे. दोघांच्याही घरात कृषीविषयक जाणकार नेते असल्याने, लहानपणापासूनच कृषिसंस्कार झाले आहेत.

सुजय विखे पाटील आणि रोहित पवार यांच्या  भेटीला विखे-पवार वादाचीही किनार आहे. त्यामुळे कदाचित या भेटीची चर्चा राज्यभर रंगू लागली आहे. पद्मभूषण दिवंगत बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद महाराष्ट्राला परिचित आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्याची संधी कधीच सोडली नव्हती. पुढे अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील या पुढल्या पिढीच्या नेत्यांमध्येही कधी सूर जुळला नाही. या दोन्ही नेत्यांमध्येही कायम धुसफूस सुरुच असते.

दरम्यान, आता शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि बाळासाहेब विखे पाटलांचे नातू सुजय विखे पाटील हे दोघेही एकत्र येत, आपल्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे दाखवून दिल्याने, नगर-पुण्यात नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात झाली आहे. शिवाय, पवार-विखे वादाचा अंक संपून, मैत्रीचा नवा अंक सुरु झाल्याचीही चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.